आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा तिकेन भागात बुधवारी पहाटे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन अतिरेकी ठार झाले. त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. परिसरात शोध मोहीम राबवली जात आहे. येथे दहशतवादी लपवल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी घेराव घातला, त्यानंतर त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला, असे सांगितले जात आहे. जबाबी कारवाईत दोन दहशतवादी ठार झाले आहेत.
रविवारी श्रीनगरमध्ये पोलिस पार्टीवर झाला होता हल्ला
रविवारी अतिरेक्यांनी श्रीनगरच्या हवाल चौक भागात पोलिस पार्चीवा लक्ष्य केले. या हल्ल्यात एक सैनिक आणि एक नागरिक जखमी झाले होते. यापूर्वी 26 नोव्हेंबर रोजी दहशतवाद्यांनी श्रीनगरमधील HMT भागात सुरक्षा दलावर हल्ला केला होता. या हल्ल्यात दोन दवान शहीद झाले होते. मुंबई हल्ल्याला 12 वर्षे पूर्ण झाली त्या दिवशी हा हल्ला करण्यात आला होता.
दोन दिवसांपूर्वीच दहशतवाद्यांशी संबंधित 5 आरोपींना दिल्लीत अटक करण्यात आली होती दिल्ली पोलिसांनी सोमवारी दहशतवादी संघटनांशी संबंधित 5 लोकांवर कारवाई केली. त्यातील दोन पंजाब आणि तीन काश्मीरचे आहेत. शब्बीर अहम, अयूब पठाण, रियाज राठर, गुरजित सिंह आणि सुखदीप सिंह अशी त्यांची नावे आहेत. शकरपूर भागात चकमकीनंतर ते पकडले गेले. गुरजित आणि सुखदीप हे गुंड असून ते पंजाबमधील शौर्य चक्र विजेता कार्यकर्ता बलविंदर यांच्या हत्येमध्ये सहभागी होते. अन्य तिघे हिज्बुल मुजाहिद्दीनशी संबंधित आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.