आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jammu Kashmir Uri Terrorists Encounter Update | Three Gunned Down By Security Forces

दहशतवाद्यांचे मोठे षडयंत्र हाणून पाडले:जम्मू-काश्मीरच्या उरीमध्ये सुरक्षा दलांकडून 3 दहशतवाद्यांचा खात्मा; 5 AK-47, 8 पिस्तूल आणि 70 ग्रेनेड केले जप्त

श्रीनगर2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नियंत्रण रेषेवर उरीजवळील रामपूर सेक्टरमध्ये भारतीय लष्कराने गुरुवारी तीन दहशतवाद्यांना ठार केले. दहशतवाद्यांनी अलीकडेच पाकव्याप्त काश्मीरमधून भारतीय हद्दीत प्रवेश केला होता. या कारवाईत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडून लष्कराने 5 एके -47 रायफल, 8 पिस्तूल आणि 70 ग्रेनेड जप्त केले आहेत.

चिनार कॉर्प्सचे कमांडर जनरल डीपी पांडे यांनी सांगितले की, दहशतवाद्यांकडून पाकिस्तानी चलनही जप्त करण्यात आले आहेत. ते पाकिस्तानमार्गे भारतात दाखल झाले. गेल्या 4 दिवसांपासून शोधमोहीम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

18 सप्टेंबरलाही घुसखोरीचा प्रयत्न फसला
जनरल पांडे म्हणाले की, गुरुवारी पहाटे रामपूर सेक्टरच्या हातलंगा जंगलात संशयास्पद हालचाली दिसून आल्या. सुरक्षा दलांनी एक ऑपरेशन करून 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला. 18 सप्टेंबरलाही घुसखोरीचा प्रयत्न झाला. तोही उधळला गेला.

शोपियानमध्ये सुरक्षा दलांनी 1 दहशतवादी ठार केला
यापूर्वी जम्मू -काश्मीरच्या शोपियांमध्ये सुरक्षा दलांनी केलेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला होता. अनायत अशरफ दार नावाच्या दहशतवाद्याने बुधवारी संध्याकाळी एका नागरिकावर गोळीबार करून त्याला जखमी केले होते. यानंतर दहशतवाद्यांविरोधात शोधमोहीम सुरू झाली.

दहशतवाद्याला आत्मसमर्पण करण्याची संधी दिली
जम्मू -काश्मीर पोलिसांनी सांगितले की त्यांनी दहशतवाद्याला आत्मसमर्पण करण्याची संधी दिली होती, परंतु त्याने ते नाकारले. यानंतर सुरक्षा दलांनी त्याला गोळ्या घालून ठार केले.

अफगाण दहशतवादी भारतात घुसले
दुसरीकडे, तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता ताब्यात घेतल्यानंतर अफगाण दहशतवादी पहिल्यांदाच भारतात घुसल्याच्या बातम्या आहेत. अहवालानुसार, गुप्तचर संस्थांनी अलर्ट जारी करून मोठा हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. दहशतवादी लष्कराच्या छावण्या किंवा मोठ्या सरकारी संस्थांना लक्ष्य करू शकतात.

पाकिस्तानने घुसखोरीला मदत केली
अहवालानुसार, पाकिस्तानने या दहशतवाद्यांना सीमा ओलांडण्यास मदत केली आहे. अफगाण दहशतवादी घातक शस्त्रांनी सज्ज असल्याचे सांगितले जात आहे. अफगाण दहशतवाद्यांना भारतात प्रवेश केल्यानंतर परतणाऱ्या पाकिस्तानींची भारतीय सुरक्षा दलांशी चकमक झाली. यामध्ये एक भारतीय जवान देखील जखमी झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...