आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jammu Network Of Extremists; Due To Restrictions, Tourism, Trade Stalled, Tourists Dropped 8 Times

370 नंतरचे 365 दिवस:अतिरेक्यांचे नेटवर्क खिळखिळे; निर्बंधांमुळे पर्यटन, व्यापार ठप्प, पर्यटक 8 पट घटले

श्रीनगर/जम्मूएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 रद्द केल्याच्या ऐतिहासिक निर्णयाची उद्या पहिली वर्षपूर्ती

जम्मू-काश्मिरात कलम ३७० रद्द करण्याच्या केंद्राच्या निर्णयाला बुधवारी एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र, काश्मीर खोरे अजूनही नव्या पहाटेच्या प्रतीक्षेत आहे. त्या वेळी बदल आणि विकासाबाबत दिलेली आश्वासने ३६५ दिवसांनंतरही भूतलावरील या स्वर्गात अवतरलेली दिसत नाहीत. व्यापार, पर्यटन, शिक्षणासह प्रत्येक क्षेत्रासाठी हा एक वर्षाचा काळ संकटाचा होता. ५ ऑगस्ट २०१९ ला कलम ३७० रद्द करण्यात आले. केंद्र सरकारने हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे म्हटले होते. मात्र, यानंतर कर्फ्यूसारख्या निर्बंधांमुळे काश्मिरी जनता अडचणीत आली. २०२० च्या सुरुवातीला सूट मिळण्यास सुरुवात झाली खरी, पण पुन्हा लॉकडाऊन लावण्यात आला.

काश्मीर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आशिक सांगतात, बाहेरील गुंतवणूकदारांपेक्षा स्थानिक व्यापाऱ्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पर्यटन ठप्प असल्याने दल लेकजवळ भाजीपाला विकणारे अश्फाक अहमद यांच्यानुसार, दिवसाला २०० रुपये मिळणेही कठीण झाले आहे. यापूर्वी ते शिकाऱ्यातून चारपट जास्त पैसै कमावायचे.

निर्यात/व्यापार : काश्मिरी अर्थव्यवस्थेचे ४० हजार कोटी रुपयांचे नुकसान
काश्मीरमधून दरवर्षी सुमारे १६०० कोटींचे वूडन हँडक्राफ्ट, कागद-मॅश आणि शालची निर्यात केली जाते. काश्मीर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे (केसीसीआय) अध्यक्ष शेख आशिक यांच्यानुसार, ५ ऑगस्टपासून ४० हजार कोटींचे नुकसान झाले. काश्मीर इंडस्ट्रीज अँड कॉमर्सचे संचालक महमूद अहमद शहा यांच्या दाव्यानुसार, सरकारने मोठ्या प्रमाणात जमीन शोधली असून यावर उद्योग उभारण्यासाठी २४० हून जास्त गुंतवणूकदारांनी तयारी दर्शवली आहे.

पर्यटन : पर्यटक ८ पट घटले, शिकारा चालवणारे भाजीपाला विकताहेत
पर्यटन क्षेत्रावर काश्मीरमधील सुमारे २० % लोकसंख्या अवलंबून आहे. २०१८ ला ऑगस्ट-डिसेंबरमध्ये ३,६३,४३४ पर्यटक आले. २०१९ मध्ये हा आकडा ४३०५९ होता. ट्रॅव्हल एजन्सीचे संचालक जॉन मोहंमद सांगतात, ५ ऑगस्टनंतर ५० पेक्षा जास्त बुकिंग रद्द झाल्या. १० लाखांचे नुकसान झाले. दल लेकजवळील शिकारा चालक रोज ८०० रुपये कमवायचे. आता बहुतांश शिकारा चालकांनी भाजीपाला विकणे सुरू केले आहे.

इंटरनेटच्या कमी वेगामुळे ऑनलाइन शिक्षण ठप्प
खोऱ्यात इंटरनेट स्पीड महत्त्वाचा मुद्दा आहे. ऑनलाइन व्यावसायिक रफी म्हणाले, आमचे क्षेत्र संकटात आहे. मंद इंटरनेटमुळे ऑनलाइन शिक्षणात अडथळा येत आहे. निर्बंधांमुळे मुले आधीच शाळांपासून दूर होती. मार्चमध्ये शाळा उघडल्या...पण फक्त १२ दिवसांसाठी. नंतर पुन्हा लॉकडाऊन लावण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...