आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jammu Will Develop With Kashmir, Grandfathering Of Three Families Will Not Work: Home Minister Amit Shah

जम्मू-काश्मीर:जम्मूचा विकास काश्मीरसोबत होईल, तीन कुटुंबांची दादागिरी चालणार नाही : गृहमंत्री अमित शहा

जम्मू-काश्मीरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू-काश्मीरच्या विकासात आता कुणी आडकाठी घालू शकणार नाही, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिला आहे. मेहबूबा मुफ्ती आणि फारूक अब्दुल्ला कुटुंबांवर निशाणा साधत शहा म्हणाले, आता जम्मू-काश्मीरमध्ये तीन कुटुंबांची दादागिरी चालणार नाही. जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा संपुष्टात आल्यानंतर प्रथमच राज्याच्या दौऱ्यावर आलेले शहा रविवारी जम्मूच्या भगवतीनगरमध्ये जाहीर सभेत बोलत होते. जम्मू-काश्मीर दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी शहा यांनी जम्मूत आयआयटीच्या नव्या कॅम्पसचे उद्‌घाटन केले.

शहा म्हणाले, काल ही तीन कुटुंबे मला प्रश्न विचारत होती की, काय देऊन जाणार आहात? भाई, मी तर हिशेब घेऊन आलो की काय देऊन जाऊ. मात्र, ७० वर्षांत तीन कुटुंबांनी जम्मू-काश्मीरमध्ये राज्य केले, तुम्ही काय दिले याचा हिशेब मांडा. आज जम्मू-काश्मीर हिशेब मागत आहे. शहा म्हणाले, कलम ३७० आणि ३५ ए हटवल्याने जम्मू-काश्मीरच्या लाखो नागरिकांना हक्क प्राप्त झाला आहे. आता प्रत्येक गाव, प्रत्येक तालुका, प्रत्येक जिल्ह्यात पंचायत व्यवस्था आहे. प्रथम शीख, खत्री, महाजनांना जमीन खरेदीचा अधिकार नव्हता. गुर्जर आणि पर्वतीय क्षेत्रातील लोकांना आरक्षण मिळत नव्हते. आता भारतीय घटनेचे सर्व हक्क सर्वांना मिळणार आहेत. २५ हजार नोकऱ्या सर्व्हिस सलेक्शन बोर्डाद्वारे दिल्या आहेत. त्यातील ७ हजार नियुक्ती पत्र याच मंचावर देण्यात आले.

शोपियांत एका नागरिकाची हत्या, पूंछमध्ये तीन सुरक्षा रक्षक जखमी
श्रीनगर | जम्मू-काश्मीरच्या शोपियांमध्ये रविवारी एका नागरिकाची गोळी झाडून हत्या करण्यात आली. जैनापोरा भागातील बाबापोरामध्ये स्थानिक नागरिक शाहिद अहमदवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोणत्या स्थितीत हल्ला झाला, याची चौकशी केली जात आहे. हा दहशतवादी हल्ला आहे की नाही याला संस्थांचा दुजोरा मिळाला नाही. दुसरीकडे, पूंछच्या जंगलांमध्ये सुरक्षा दलांच्या शोध पथकावर रविवारी अतिरेक्यांनी गोळीबार केला. यामध्ये तीन सुरक्षा रक्षक जखमी झाले. सुरक्षा दलांद्वारे अटक केलेला एक पाकिस्तानी अतिरेकीही जखमी झाला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मेंढरच्या भट्टा दुर्रिया जंगलात मोठ्या प्रमाणात गोळीबार आणि स्फोटाचे वृत्त आहे.

बातम्या आणखी आहेत...