आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झारखंड:जमशेदपूरमध्ये हिंसक चकमकीनंतर इंटरनेट बंद, कलम 144 लागू; परिसरात सुरक्षा दलांचा फ्लॅग मार्च

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

झारखंडमधील जमशेदपूरमध्ये शनिवारी रात्री दोन गटामध्ये हिंसक चकमक झाली. रविवारीही हल्लेखोरांनी अनेक दुकाने पेटवून दिली आणि एकमेकांवर दगडफेक केली. रात्री उशिरा प्रकरण शांत झाले. सोमवारी सकाळी प्रशासनाने शहरात 144 कलम लागू करून इंटरनेट बंद केले. सुरक्षा दलांनी शहरात फ्लॅग मार्च काढला असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.

दगडफेक, गोळीबार
कदम शास्त्री नगर ब्लॉक क्रमांक दोनमध्ये रविवारी सायंकाळी दोन समुदायांमध्ये दगडफेक झाली. दगडफेकीनंतर पोलिसांना गोळीबार झाल्याचीही माहिती मिळाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबारही केला. दगडफेक करणाऱ्यांनी दुकाने पेटवली. सहा दुकाने, दोन दुचाकी जळाल्या.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी झारखंड अग्निशमन दल आणि टाटा स्टीलच्या दोन फायर इंजिनांना पाचारण करण्यात आले. सुमारे तीन तास चाललेल्या दगडफेकीत एसएसपी प्रभात कुमार यांच्यासह अनेक पोलीस जखमी झाले. दगडफेक आणि गोंधळ घालणाऱ्या 60 हून अधिक तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. परिसरात तणावाचे वातावरण असले तरी सुरक्षा दलांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

मजबूत सुरक्षा व्यवस्था
जमशेदपूरमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. रविवारी रात्री नऊ वाजता आरएएफच्या तीन कंपन्या पोहोचल्या. रात्री उशिरा चाईबासा आणि सरायकेला येथून 400 जवानांची फौज बोलावण्यात आली. त्याचबरोबर झॅप 6 चे जवानही तैनात करण्यात आले आहेत.

वाद कसा सुरू झाला
कदम शास्त्री नगर ब्लॉक क्रमांक 3 चौकात शनिवारी सायंकाळी समाजकंटकांनी मांसाने भरलेली पॉलिथीन पिशवी ध्वजाच्या बांबूला बांधली होती. रविवारी कदम शास्त्री नगर ब्लॉक क्रमांक २ येथील जटाधारी हनुमान मंदिरात एका बाजूच्या संघटनांची बैठक झाली. सभेवर अचानक दगडफेक सुरू झाली. यानंतर हिंसाचार उसळला.

प्रशासन काय म्हणाले
उपायुक्त विजया जाधव म्हणाल्या की, काही समाजकंटकांनी जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला आहे. प्रशासन संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. कोणत्याही प्रकारच्या अफवांकडे लक्ष देऊ नये आणि शांतता राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आहे.