आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या अहमदाबादेतून स्वातंत्र्याच्या ७५ व्या सोहळ्याचा शुभारंभ केला. ‘आजादी का अमृत महोत्सव’, असे या सोहळ्याला नाव देण्यात आले आहे. शुक्रवारी गांधीजींच्या मिठाच्या सत्याग्रहालाही ९१ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त अहमदाबादच्या साबरमती आश्रमातील महोत्सवाच्या मुख्य कार्यक्रमाचे उद्घाटन मोदींनी केले. यादरम्यान त्यांनी जवाहरलाल नेहरू यांचाही उल्लेख केला. ते म्हणाले, ‘इंग्रजांपुढे गर्जना करणाऱ्या राणी लक्ष्मीबाई, पंडित नेहरू, सरदार पटेल आदी असे अगणित जननायक स्वातंत्र्याच्या आंदोलनाचे मार्गदर्शक होते.’ मोदींनी दांडी मार्चलाही हिरवी झंेडी दाखवली. ‘आजादी का अमृत महोत्सव’ वेबसाइटही लाँच केली.
गांधीजींनी आत्मनिर्भरता संदेश साबरमतीतून दिला
साबरमती आश्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीजींच्या प्रतिमेवर पुष्प अर्पण केले. मोदींनी व्हिजिटर्स बुकमध्ये लिहिले, ‘साबरमती आश्रमातून गांधीजींनी आत्मनिर्भरता आणि आत्मसन्मानचा संदेशही दिला होता.’ पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षी आमचे विचार, उपलब्धी, कार्य आणि संकल्प- हे स्तंभच देशाला पुढे वाटचाल करण्यासाठी प्रेरित करतील.
कलाविश्वातील लाेकांनी स्वातंत्र्याच्या कथांवर चित्रपट करावेत
- मोदी म्हणाले, ‘कोरोनावरील लस निर्मितीत भारताच्या आत्मनिर्भरतेचा लाभ अवघ्या जगाला मिळत आहे. आपण कुणाला दु:ख दिले नाही. मात्र इतरांचे दु:ख दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आज जग भारताला धन्यवाद देत आहे आणि आपल्यावर विश्वासही ठेवत आहे.’
- ‘कला-चित्रपटसृष्टीतील लोकांना आग्रह आहे की त्यांनी स्वातंत्र्याच्या विखुरलेल्या कथा पुढील पिढीपर्यंत पोहोचवाव्यात. ज्या मुलांना नाटकांत रस आहे त्यांनी नाटके लिहावीत. सुरुवातीला हे सर्व हस्तलिखित असावे, मग डिजिटल करावे. १५ ऑगस्टपूर्वी ते पूर्ण करण्यात यावे.’
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.