आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजपान पुढील पाच वर्षांत भारतात ३.२ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या शिखर चर्चेनंतर ही घोषणा केली.
दोन्ही देशांत स्वच्छ ऊर्जेत भागीदारी वाढवण्यासह विविध क्षेत्रांत सहा करार झाले आहेत. जपानने २०१४ मध्ये केलेल्या गुंतवणूक प्रोत्साहन भागीदारीअंतर्गत भारतात ३.२० लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूक उद्दिष्टाची घोषणा केली आहे. जपानने ईशान्य भागासाठी सातत्यपूर्ण विकास पुढाकाराची घोषणाही केली. युक्रेनवर रशियाने केलेल्या आक्रमणाच्या मुद्द्यावर किशिदा म्हणाले की, ताकदीचा वापर करून यथास्थिती बदलण्याच्या एकतर्फी प्रयत्नांना परवानगी दिली जाऊ नये. रशियाचा हल्ला हे गंभीर प्रकरण आहे. आम्ही या मुद्द्यावर चर्चा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, जग अजूनही कोविड आणि त्याच्या दुष्परिणामांशी झुंजत आहे. जगाची अर्थव्यवस्था रुळावर परत येण्याच्या प्रक्रियेत अजूनही अडचणी येत आहेत. भू-राजकीय घटनांमुळेही नवी आव्हाने निर्माण होत आहेत. यासंदर्भात भारत-जपान भागीदारी आणखी मजबूत करणे हे फक्त दोन्ही देशांसाठीच महत्त्वाचे नाही तर त्यामुळे हिंद-प्रशांत क्षेत्र आणि संपूर्ण जागतिक स्तरावरही शांतता, समृद्धी आणि स्थैर्याला प्रोत्साहन मिळेल.
भारत आणि जपानमधील मागील शिखर बैठक ऑक्टोबर २०१८ मध्ये टोकियोत झाली. डिसेंबर २०१९ मध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून झालेल्या व्यापक निदर्शनांमुळे मोदी आणि जपानचे तत्कालीन पंतप्रधान शिंझो आबे यांच्यातील गुवाहाटीत प्रस्तावित वार्षिक शिखर चर्चा रद्द करण्यात आली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.