आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताला जपानी गुंतवणुकीचे बूस्टर:जपान पुढील 5 वर्षांत 3.2 लाख कोटींची करणार गुंतवणूक, मोदींची भेट घेतल्यानंतर जपानच्या पंतप्रधानांनी केली घोषणा

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जपानची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रथमच भारत दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी शनिवारी पुढील 5 वर्षांत भारतात तब्बल 3.2 लाख कोटींची गुंतवणूक करण्याची घोषणा केली. या घोषणेमुळे कोरोना महामारीमुळे चढ-उतार अनुभवत असणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेला मोठे बूस्टर मिळाले आहे.

जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा शनिवारी २ दिवसीय भारत दौऱ्यावर आले. त्यांनी राजधानी नवी दिल्ली स्थित हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी उभय नेत्यांनी दि्वपक्षीय तथा रशिया-युक्रेन युद्धासह जागतिक महत्वाच्या अनेक मुद्यांवर विस्तृत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी 14 व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागही घेतला.

या परिषदेत पंतप्रधान मोदींनी जपानचे पंतप्रधान आपले जूने मित्र असल्याचे स्पष्ट केले. जपानच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर फुमियो किशिदा यांचा हा पहिला भारत दौरा असून, ते प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलेत. शनिवारी सायंकाळी 5 च्या सुमारास हैदराबाद हाऊसमध्ये दोन्ही नेते भेटले.

मोदी म्हणाले, जपानच्या कंपन्यांना सर्वोतपरी मदत करू

भारत-जपान आर्थिक परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रगती, समृद्धी व भागिदारी जपान-भारताच्या संबंधांचा मुख्य आधार असल्याचे स्पष्ट केले. सरकार भारतातील जपानी कंपन्यांना सर्वोतपरी मदत करण्यास कटिबद्ध आहे. सद्यस्थितीत दोन्ही देशांतील आर्थिक भागिदारीत मोठी प्रगती झाली आहे. जपान भारतातील सर्वात मोठ्या गुंतवणूकदारांपैकी एक आहे, असे ते म्हणाले. भारत-जपान 'मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडोर'वर 'वन टीम-वन प्रोजेक्ट' म्हणून काम करत आहेत. आजच्या आमच्या चर्चेमुळे आपसातील सहकार्य एका नव्या उंचीवर नेण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. आम्ही द्विपक्षीय मुद्यांसह विविध प्रादेशिक व वैश्विक मुद्यांवरही विचारांचे आदान-प्रदान केले. आम्ही संयुक्त राष्ट्र व अन्य आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरील परस्पर समन्वय वाढवण्याचाही निर्णय घेतला आहे, असे मोदी यांनी सांगितले.

दोन्ही पंतप्रधानांनी रशिया-युक्रेन वादावर शांततापूर्ण तोडगा काढण्याची गरज व्यक्त केली
दोन्ही पंतप्रधानांनी रशिया-युक्रेन वादावर शांततापूर्ण तोडगा काढण्याची गरज व्यक्त केली

किशिदांचा युक्रेन प्रश्न शांततेत सोडवण्यावर भरदुसरीकडे, जपानचे पंतप्रधान किशिदा यांनी यावेळी युक्रेन-रशिया वादावर शांततेत तोडगा काढण्याची गरज व्यक्त केली. जगभरातील अस्थिरतेचे वातावरण पाहता आज भारत-जपानमध्ये घनिष्ठ भागिदारी होण्याची गरज आहे. आम्ही आपले विचार व्यक्त केले. रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्यावर विचारविनिमय केला. या प्रकरणी जागतिक नियम व कायद्यांनुसार शांततेत तोडगा काढण्याची गरज आहे. जपान, भारताच्या मदतीने जगातील संघर्ष संपुष्टात आणण्याच्या दिशेने प्रयत्न करेल. तसेच युक्रेन व त्याच्या शेजारी देशांना मानवीय मदत पोहोचवण्याचाही प्रयत्न करेल, असे किशिदा म्हणाले.

जपानच्या पंतप्रधानांनी मोदींना टोक्योत होणाऱ्या क्वाड परिषदेसाठी निमंत्रित केले.
जपानच्या पंतप्रधानांनी मोदींना टोक्योत होणाऱ्या क्वाड परिषदेसाठी निमंत्रित केले.

पंतप्रधान मोदींना क्वाड परिषदेचे निमंत्रण

किशिदा यांनी यावेळी दोन्ही देशांत सायबर सुरक्षेशी संबंधित एक महत्वपूर्ण करार झाल्याचेही स्पष्ट केले. भारत जपानचा एक महत्वपूर्ण भागिदार आहे. त्यामुळे मी पंतप्रधान मोदींना टोक्योत होणाऱ्या क्वाड परिषदेचे निमंत्रण देत आहे, असे ते म्हणाले.

दोन्ही पंतप्रधानांनी 14 व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभाग घेतला.
दोन्ही पंतप्रधानांनी 14 व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभाग घेतला.

मागील शिखर संमेलन टोक्योत झाले होते

क्वाडचे मागील शिखर संमेलन ऑक्टोबर 2018 मध्ये जपानची राजधानी टोक्योत झाले होते. विश्लेषकांच्या मते, तेव्हापासून आतापर्यंत क्षेत्रीय स्थितीत नाटकीय बदल झाला आहे. टोक्योतील टेम्पल विद्यापीठाचे आंतरराष्ट्रीय संबंधांचे सहयोगी प्राध्यापक जेम्स ब्राऊन यांच्यानुसार, भारतासोबतचे द्विपक्षीय संबंध जपानच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे आहेत. कारण, आजच्या स्थितीत केवळ अमेरिकेवर विसंबून राहणे पुरेसे नाही हे जपानच्या आता लक्षात आले आहे. ब्राऊन यांच्या मते, भारत एक मोठा देश व उदयोन्मुख आर्थिक महासत्ता आहे. त्यामुळे जपानची त्याच्याशी अधिक मजबूत संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा आहे.

पुढील वर्षी मार्च महिन्यात 6 भारतीय सूखोई लढाऊ विमाने जपानला जाणार

जपानच्या राष्ट्रीय संरक्षण अभ्यास संस्थेच्या तज्ज्ञांच्या मते, स्वतंत्र व खूल्या हिंद-प्रशांत क्षेत्रासाठी भारत जपानचा सर्वात महत्वाचा भागीदार आहे. त्यामुळे हे संबंध पुढे नेण्यासाठी पुढील वर्षी मार्च महिन्यात भारतीय हवाई दल आपली 6 सूखोई लढाऊ विमाने जपानला पाठवेल.

चीनच्या मुद्यावर ऑस्ट्रेलियाला आलेल्या अनुभवातूनही धडा घेता येईल. ऑस्ट्रेलियाला राजकीय व आर्थिक दबावानंतरही स्वतःची चीनपासून सुटका करवून घेण्यात यश आले आहे, असे ब्राऊन म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...