आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jash Terrorist Did Reiki Of Ajit Doval's Office, Video Was To Be Sent To Pakistani Handler Doctor

पाकिस्तानच्या कारस्थानाचा खुलासा:जैशच्या दहशतवाद्याने केली होती अजीत डोभाल यांच्या कार्यालयाची पाहणी, डोभाल यांच्या सुरक्षेत वाढ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • व्हिडिओ पाकिस्तानी हँडलर डॉक्टरला पाठवायचा होता

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजीत डोभाल यांच्या ऑफीसची एका दहशतवाद्याने पाहणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत एक व्हिडिओ सुरक्षा यंत्रणांच्या हाती लागला, यानंतर आता डोभाल यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 6 फेब्रुवारीला काश्मीरच्या शोपियांमध्ये राहणाऱ्या जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याला अटक करण्यात आले होते. त्याने चौकशीत हा व्हिडिओ समोर आला. त्या दहशतवाद्याला हा व्हिडिओ आपल्या पाकिस्तानी हँडलरला पाठवायचा होता. त्या हँडलरला तो डॉक्टर नावाने ओळखतो.

या प्रकरणाशी संबंधित सूत्रांच्या हवाल्याने मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगितले जात आहे की, जैशचा दहशतवादी हिदायतुल्ला मलिकने चौकशीत सांगितले की, त्याने आपल्या पाकिस्तानी हँडलर्सच्या सांगण्यावरुन अजीत डोभाल यांच्या कार्यालयासह इतर काही इमारतींची पाहणी केली होती.

24 मे रोजी विमानाने दिल्लीला आला होता मलिक

हिदायतुल्ला मलिकला अनंतनागमधून ताब्यात घेतले होते. तो जैशचा फ्रंट ग्रुप लश्कर-ए-मुस्तफाचा चीफ आहे. अटकेदरम्यान मलिकडून मोठ्या प्रमाणात दारु-गोळा जप्त करण्यात आला आहे. चौकशीत मलिकने सांगितले की, तो 24 मे 2019 ला इंडिगोच्या फ्लाइटने श्रीनगरवरुन दिल्लीला आला होता. मलिकला डोभाल यांचे कार्यालय, सरदार पटेल भवन आणि CISF च्या सुरक्षा व्यवस्थेचा व्हिडिओ बनवायचा होता. मलिकला हा व्हिडिओ वॉट्सअॅपद्वारे आपल्या पाकिस्तानी हँडलरला पाठवायचा होता.

2020 मध्ये सुसाइड अटॅकचा प्लॅन

रिपोर्ट्सनुसार, मलिकने चौकशीत सांगितले की, त्याला मे 2020 मध्ये एका आत्मघाती हल्ल्यासाठी एक सँट्रो कारदेखील दिली होती. यासाठी मलिकने इरफान ठोकार, उमर मुश्ताक आणि रईस मुस्तफासोबत मिळून जम्मू-काश्मीरच्या एक बँकेच्या कॅश व्हॅनमधून 60 लाख रुपये लुटले होते.

सर्जिकल स्ट्राइक आणि एअरस्ट्राइकनंतर दहशतवाद्यांच्या निशाण्यावर डोभाल

NSA डोभाल उरी सर्जिकल स्ट्राइक आणि बालाकोट एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत. जैशचा म्होरक्या मसूद अजहरसोबत डोभाल यांचे जुने शत्रुत्वआहे. डोभाल यांनीच 1994 मध्ये अजहरला पकडल्यानंतर त्यांची चौकशी केली होती. 1999 मध्ये कंधार विमान अपहरणानंतर डोभाल मसूद अजहरला घेऊन कंधार विमानतळावर गेले होते.