आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Jaswant Singh, Who Was A Minister In The Atal Government, Died At The Age Of 82,

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माजी मंत्री जसवंत सिंह यांचे निधन:अटल सरकारमध्ये परराष्ट्र, संरक्षण आणि आर्थिक तिन्ही विभाग सांभाळले, 1999 मध्ये हायजॅक विमान सोडवण्यात महत्वाची भूमिका बजावली

नवी दिल्ली7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मोदी म्हणाले - ते वेगळ्या प्रकारच्या राजकारणासाठी आठवणीत राहतील

अटल सरकारमध्ये मंत्री राहिलेले जसवंत सिंह (82) यांचे निधन झाले. 25 जून रोजी त्यांना दिल्लीच्या आर्मी रुग्णालयात दाखल केले होते. आज सकाळी 6.55 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मल्टी-ऑर्गन डिसफंक्शन सिंड्रोमवर उपचार सुरू होते, म्हणजेच अवयवांनी व्यवस्थित काम करणे थांबवले होते. जसवंत सिंह राजकारणात येण्याआधी सैन्यात होते. ते मेजर पदावरून निवृत्त झाले होते.

जसंवत यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुःख व्यक्त केले

मोदींनी ट्विट केले की, ते आपल्या वेगळ्या राजकारणासाठी नेहमी आठवणीत राहतील. त्यांनी भाजपला बळकटी देण्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्याच्याबरोबर झालेल्या चर्चा मला कायम लक्षात राहतील.

विमान हायजॅक झाल्यानंतर दहशतवाद्यांना घेऊन कंधारला गेले होते

अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये जसवंत यांनी परराष्ट्र, संरक्षण आणि वित्त हे तिन्ही महत्वाचे विभाग सांभाळले. 24 डिसेंबर 1999 मध्ये इंडियन एअरलाइन्सचे IC-814 विमान हायजॅक करून अफगानिस्तानच्या कंधारला नेले होते. प्रवाशांना वाचवण्यासाठी भारत सरकारला तीन दहशतवाद्यांना सोडावे लागले होते. या दहशतवाद्यांमध्ये मुश्ताक अहम जरगर, अहमद उमर सईद शेख आणि मौलाना मसूर अजहर यांचा समावेश होता. जसवंत या दहशतवाद्यांना घेऊन स्वतः कंधारला गेले होते. 1998 मध्ये झालेल्या अणुचाचणीनंतर अमेरिकेने भारतावर कडक निर्बंध लादले होते. तेव्हा जसवंत यांनीच अमेरिकेसोबत चर्चा केली होती. 1999 मध्ये कारगिल युद्धाच्या वेळी देखील त्यांची महत्वाची भूमिका होती.

एकदा पक्षाने बाहेर काढले, एकदा स्वतः पक्ष सोडला

2012 मध्ये भाजपने त्यांना उप राष्ट्रपती पदाचा उमेदवार बनवले होते, मात्र यूपीएच्या हामिद अंसारी यांच्याकडून पराभव पत्कारावा लागला. जसवंत यांनी आपल्या पुस्तकात मुहम्मद अली जिन्ना यांचे कौतुक केले. यानंतर भाजपने त्यांना पक्षातून बाहेर काढले. 2010 मध्ये पुन्हा परतले. 2014 मध्ये भाजपने त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट दिले नाही. त्यांच्या बाडमेर जागेवर भाजपने कर्नल सोनाराम चौधरी यांनी संधी दिली. यानंतर जसवंत यांनी पुन्हा भाजपला रामराम ठोकला आणि अपक्ष उभे राहिले. मात्र पराभव स्वीकारावा लागला. यावर्षी त्यांच्या डोक्याला मार लागला होता. तेव्हापासून ते कोमात होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली.

बातम्या आणखी आहेत...