आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Javed Akhtar On Urdu Language History; India Vs Pakistan Relations | Bollywood News

उर्दू ही भारताची भाषा आहे, पाकिस्तानची नाही:जावेद अख्तर म्हणाले - धर्म आणि भाषेचा संबंध नाही, उर्दूला महत्त्व दिले पाहिजे

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गीतकार जावेद अख्तर आणि त्यांची पत्नी शबाना आझमी यांनी नुकताच 'शायराना- सरताज' हा उर्दू अल्बम लाँच केला. या कार्यक्रमात जावेद अख्तर यांनी उर्दू भाषेचे महत्त्व सांगितले. उर्दू ही पाकिस्तान किंवा इजिप्तची नाही, ती हिंदुस्थानची भाषा आहे, असे ते म्हणाले. कोणत्याही भाषेचा कोणत्याही विशिष्ट धर्माशी संबंध नसतो, असे ते म्हणाले.

उर्दू ही भारताची भाषा
या कार्यक्रमात जावेद अख्तर म्हणाले की, 'उर्दू इतर कोणत्याही ठिकाणाहून आलेली नाही. ही आपल्या भारताची भाषा आहे. हे भारताबाहेर बोलली जात नाही. ती पाकिस्तान किंवा इजिप्तची भाषा नाही. पाकिस्तानही पूर्वी अस्तित्वा

त नव्हता. तोही भारतातूनच आला आहे. जावेद अख्तर यांच्या मते उर्दूच्या विकासात पंजाबचा मोठा वाटा आहे.

'तरुण पिढीने हिंदी आणि उर्दू बोलले पाहिजे'
जावेद अख्तर म्हणाले की, आपण उर्दू भाषा पाकिस्तानमुळे का सोडली? काश्मीर आपलेच आहे, असे पाकिस्तानने म्हटले. तर ते तुम्ही मान्य कराल का? त्याचप्रमाणे उर्दू ही देखील भारताची भाषा आहे. ज्याकडे आपण सर्वांनी लक्ष दिले पाहिजे.

आजकाल नवीन पिढी इंग्रजीवर जास्त भर देते. तरुण पिढी आणि लोक कमी उर्दू आणि हिंदी बोलतात. आपण हिंदीत बोलले पाहिजे. कारण ती आपली राष्ट्रभाषा आहे. भाषा कोणत्याही विशिष्ट धर्माशी संबंधित नसून ती प्रदेशांवर आधारित असल्याचेही जावेद अख्तर म्हणाले. भाषेचा संबंध धर्माशी असता तर संपूर्ण युरोपात एकच भाषा बोलली गेली असती.

जावेद अख्तर यांनी पाकिस्तानात सुनावले खडेबोल

बॉलिवूडचे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी पाकिस्तानमधील एका कार्यक्रमादरम्यान सांगितले की, मुंबई हल्ल्याचे सूत्रधार येथे खुलेआम फिरत आहेत. उर्दू शायर फैज अहमद फैज यांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अख्तर लाहोरला पोहोचले होते. अख्तर यांच्या या वक्तव्याचे अभिनेत्री कंगना रनोटनेही कौतुक केले आहे. विशेष म्हणजे, अभिनेत्री कंगनावर स्वतः जावेद अख्तर यांनी मानहानीचा खटला दाखल केलेला आहे. येथे वाचा संपुर्ण बातमी.

आपल्याला शेजारच्या राष्ट्रासारखे बनवले जातेय

अनेक पक्षांचे लोक एकत्र बसले. त्यांच्यात नम्रता आहे, ते एकमेकांचे विचारांचा आदर करतात. विचारधारांचा आदर करतात हाच भारत आहे. परंतु,विविधतेतील एकतेला नष्ट करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आपल्याला शेजारच्या राष्ट्रासारखे बनवले जातेय, सीमेपार लोकशाही नाही, तुम्ही ठरवा देशाला कुठे न्यायचेय असा गंभीर सवाल आणि चिंतन प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त छगन भुजबळ गौरव समितीतर्फे मुंबईतील षण्मुखानंद सभागृह येथे आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेत झालेल्या ‘अमृत महोत्सव’ सोहळ्यात ते बोलत होते. येथे वाचा संपुर्ण बातमी.

बातम्या आणखी आहेत...