आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागीतकार आणि कवी जावेद अख्तर समान नागरी कायद्याचा उल्लेख करत व संदर्भ देत म्हणाले, ‘मुस्लिम पर्सनल लॉच्या बहुपत्नीत्व प्रथेमधील एकापेक्षा जास्त बायका ठेवण्याची परवानगी समानतेविरुद्ध आहे. पती जर अनेक बायका ठेवू शकतो तर मग महिलेलाही हा अधिकार मिळायला पाहिजे. एकापेक्षा जास्त विवाह करणे आपल्या कायद्याविरुद्ध आहे. कुणी आपल्या परंपरा जपत असले तर जपू द्या, पण राज्य घटनेशी कोणतीच तडजोड खपवून घेतली जाऊ नये.’ जावेद अख्तर यांनी समान नागरी विधेयकासह आयुष्य, शायरी, ओटीटीच्या घुसखोरीवर दिलखुलास चर्चा केली.
‘समान नागरी कायद्या’ला मुद्दा बनवणाऱ्यांनी सांगावे- ते त्यांच्या बहिणी-मुलींना मालमत्तेत समान वाटा देतील का? {समान नागरी कायद्यावर तुमचे मत काय? मी आधीपासूनच समान नागरी कायद्याचे पालन करतो. मुस्लिम पर्सनल लॉनुसार तलाक झाल्यास चार महिन्यांनंतर पत्नीला काहीच द्यावे लागत नाही. हे चुकीचे आहे. मी माझी मुलगी व मुलास संपत्तीत समान वाटा देईल. समान नागरी कायद्याचा अर्थ सर्व समुदायांसाठी एक कायदा असावा, असा होत नाही. तर महिला व पुरुषांसाठी एकच कायदा असावा, असा त्याचा अर्थ आहे. जे राजकारणी समान नागरी कायद्याबद्दल बोलत आहेत ते आपल्या बहिणी-मुलींना समान संपत्ती देतील का, हे मला जाणून घ्यायचे आहे. कुणाचे पर्सनल लॉ असतील तर असू द्या, पण पर्सनल लॉ आणि घटना यापैकी एकाची निवड करावी लागली तर मी घटनेला पुढे करेन. जोपर्यंत घटनेशी छेडछाड करत नाही तोपर्यंत कुणी काहीही केले तरी आम्हाला कोणतीच हरकत नसली पाहिजे.
{देशातील सद्य:स्थितीवर काय सांगाल? मला वाटते, समाजात विचित्र तणाव आहे. तो जमिनीत उगवलेला नाही, तर तयार केला गेला आहे. तुम्ही कोणत्याही भारतीयाची डीएनए चाचणी केली तर कळेल की, ८-१० पिढ्यांपूर्वी आपणा सर्वंचे पूर्वज शेतकरी होते आणि शेतकरी नेहमी मध्यमार्गी असतो. तुकडे-तुकडे गँग, राष्ट्रविरोधी, शहरी नक्षलवाद आदी अत्यंत खेदजनक आहे. तुम्ही सरकारच्या विरोधात आहात तर तुम्ही देशद्रोही आहात? हा समज चुकीचा आहे. २०१४ पूर्वीही सरकार होते. सरकारच्या विरोधात बोलणे हेच विरोधकांचे काम आहे.
{नव्या पिढीच्या शायरीबाबत काय वाटते? आधी जे होते ते आता राहिले नाही, असे ५० वर्षांपूर्वीही लोक म्हणत. आजही वृद्ध लोक हेच सांगतात. मात्र, वास्तव हे आहे की, भाषा ही वाहती नदी आहे, ती थांबत नाही. यात नवे प्रवाह जोडले जातात. वाहती नदी चुकीच्या शब्दांमुळे नाला होऊ नये याचीच काळजी घ्यावी लागेल. {यादरम्यान त्यांनी आपली कविता ‘वक्त’चे स्मरण केले- ये जैसे पत्ते हैं बहते पानी की सतह पर जैसे तैरते हैं अभी यहां हैं अभी वहां हैं और अब हैं ओझल दिखाई देता नहीं है लेकिन ये कुछ तो है जो बह रहा है ये कैसा दरिया है
{नास्तिक असूनही धार्मिक लोकांसोबत वैयक्तिक संबंध कसे टिकवून ठेवता? खूप सोपे आहे. मतभेद असले तरी एकमेकांचा आदर केला पाहिजे. शक्यतो स्वत:कडून अशा विषयांवर चर्चा करणे टाळले पाहिजे. कारण लोक धार्मिक बाबतीत तर्कशुद्ध नव्हे तर भावुक होतात. विश्लेषण सहन करत नाहीत. {अलीकडच्या काळात चित्रपटांतून ना स्टार तयार होत आहेत ना बॉक्स ऑफिसवर कलेक्शनची धूम आहे. ही सुस्ती का? निर्मात्यापासून ते अभिनेत्यांपर्यंत सगळेच या नव्या काळामुळे हैराण आहेत. बॉलीवूडमध्ये नव्या कथा येताना दिसत नाहीत, असे मला वाटते. बहुतांश हिट चित्रपट एकतर रिमेक आहेत किंवा दक्षिणेचे आहेत. बॉलीवूडला नव्या कथांचा शोध घ्यावा लागेल.’
{काही लिहिली जाणे बाकी आहे की इच्छाच राहिलेली नाही? (गंभीर होत) खूप काही लिहू शकत होतो, असे मला जाणवते. अजून मनात खूप काही आहे. ते कागदावर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. जोपर्यंत माझे विचार पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत ते लिहिणे मी योग्य मानत नाही.’
{ओटीटी कंटेंटबाबत काय सांगाल? मला ओटीटी कंटेंट आवडतो. ‘पाताल लोक, सॅक्रेड गेम्स, मिर्झापूर’ माझे अत्यंत आवडते शो आहेत. मात्र, पूर्वी जसे कुटुंब, गृहस्थी आदींवर घरगुती चित्रपट तयार होत असत, तशाच कथा घरोघरी वाढल्या जात आहेत. आता ओटीटीनेही एक मोठा प्रेक्षक वर्ग ओढला आहे. अत्यंत मजबूत, वास्तववादी कंटेंट दिला जात आहे. लोक जे मोठ्या पडद्यावर पाहू इच्छितात अशाच चित्रपटांची निर्मिती व्हावी. तसेही लोकांना ओटीटीवर उत्तम कंटेंट आधीपासूनच मिळत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.