आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Jaya Bachchan Vs Kangana Ranaut | Samajwadi Party MP Jaya Bachchan On Kangana Ranaut

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जया बच्चन Vs कंगना:जया म्हणाल्या - फिल्म इंडस्ट्रीमध्ये नाव कमावणारे इंडस्ट्रीलाच गटार म्हणत आहेत; कंगना म्हणाली - जर तुमचा मुलगा फासावर लटकला असता, तेव्हाही असेच म्हणाल्या असत्या?

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जया बच्चन म्हणाल्या - ज्या ताटात जेवता त्यातच छिद्र नाही करु शकत, काही लोकांमुळे पूर्ण इंडस्ट्रीची प्रतिमा खराब केली जाऊ शकत नाही
  • रवी किशन म्हणाले - इंडस्ट्रीमध्ये सर्वच ड्रग्स घेत नाहीत, पण जे घेतात, ते जगातील सर्वात मोठ्या इंडस्ट्रीला संपवण्याच्या योजनेचा भाग

बॉलिवूडमधील ड्रग्ज वादावरून आता समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन आणि भाजपा खासदार रवी किशन आणि अभिनेत्री कंगना रनोट आमनेसामने आले आहेत. मंगळवारी राज्यसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी जया बच्चन कोणाचेही नाव न घेता म्हटल्या की, 'चित्रपटसृष्टीत नाव कमावणारेच त्याला गटार म्हणतात. मला आशा आहे की सरकारने अशा लोकांना अशी भाषा वापरु नका असे सांगावे. ' यावर कंगना म्हणाली की तुमचा मुलगा जर फासावर अटकला असता तर तुम्ही असे वक्तव्य केले असते? तर रवी किशन म्हणाले की, जयजींकडून अशी अपेक्षा नव्हती.

जया बच्चन म्हणाल्या की काही लोकांमुळे आपण संपूर्ण इंडस्ट्रीची प्रतिमा खराब करू शकत नाही. मला लाज वाटते की काल चित्रपटसृष्टीतील लोकसभेतील आमच्या एका सदस्याने त्याविरूद्ध भाषण केले. हे लाजीरवाणे आहे. आपण ज्या ताटात जेवतो त्यातच छिद्र करु शकत नाही. खरंतर जया बच्चन यांच्या या विधानाकडे सुशांत आत्महत्या प्रकरणानंतर बॉलिवूडसोबत कंगनाचा वाद आणि भाजप खासदार रवी किशनच्या लोकसभेतील वक्तव्याशी जोडून पाहिले जात आहे.

जया यांच्या भाषणासह कंगनाने ट्विट केले आहे
'जया जी, जर माझ्या जागी तुमची मुलगी श्वेताला मारले गेले असते, ड्रग्स दिल्या असत्या, तारुण्यात शोषण झाले असते, जर अभिषेकची सातत्याने हरॅशमेंट झाली असती आणि तुम्ही त्याला फासावर लटकलेले पाहिले असते, तर तुम्ही असे बोलू शकल्या असत्या का? आमच्यासोबत सहानुभुती ठेवा '

कंगनाने 'रेप केला तर काय झाले जेवण तर दिले ना' यावरही उत्तर दिले

रवी किशन म्हणाले- आज हा उद्योग वाचण्याची गरज आहे
जया बच्चन यांच्या विधानावर रवि किशन मंगळवारी म्हणाले की, मला आशा होती की जयजी मला साथ देतील. प्रत्येकजण इंडस्ट्रीमध्ये ड्रग्स घेत नाही, परंतु जे लोक घेतात ते जगातील सर्वात मोठी फिल्म इंडस्ट्री संपवण्याच्या योजनेचा एक भाग असतात. जेव्हा मी आणि जयाजी चित्रपटसृष्टीत सामील झालो होतो, तेव्हा परिस्थिती तशी नव्हती, मात्र आज इंडस्ट्रीला वाचवण्याची गरज आहे.

रवी किशन यांनी लोकसभेत काय म्हटले होते?
सोमवारी भाजप खासदार रवी किशन यांनी लोकसभेत ड्रग्ज आणि बॉलिवूड कनेक्शनचा मुद्दा उपस्थित केला होता. ते शून्य तासाच्या दरम्यान म्हणाले की, पाकिस्तान आणि चीनमधून ड्रग्सची तस्करी केली जात आहे. देशातील तरुण पिढी उद्ध्वस्त करण्याचा हा कट आहे. ते म्हणाले की ते आपल्या चित्रपटसृष्टीत शिरले आहे आणि एनसीबी त्याचा तपास करीत आहे. ते म्हणाले की, माझी मागणी आहे की या संदर्भात कठोर कारवाई केली जावी.