आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

भ्रष्टाचार:जया जेटलींसह तिघांना संरक्षण खरेदी घोटाळ्यात 4 वर्षांचा तुरुंगवास, 19 वर्षांपूर्वीचे प्रकरण, हायकोर्टाची स्थगिती

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुमारे १९ वर्षांपूर्वी गाजलेल्या संरक्षण खरेदी भ्रष्टाचार प्रकरणात दिल्लीतील एका न्यायालयाने समता पक्षाच्या माजी अध्यक्षा जया जेटली यांच्यासह तिघांना प्रत्येकी चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. जया जेटलींचे निकटवर्तीय गोपाल पछेरवाल आणि सेवानिवृत्त मेजर जनरल एस. पी. मुरगई यांचा अन्य दोषींत समावेश आहे.

विशेष न्यायाधीश वीरेंद्र भट यांनी गुरुवारी तिघांना प्रत्येकी एक लाख दंडही ठोठावला. शिक्षा जाहीर झाल्यानंतर जेटली यांनी अॅड. मुकुल रोहतगी आणि पी. पी. मल्होत्रा यांच्यामार्फत दिल्ली हायकोर्टात आव्हान दिले. हायकोर्टाने लगेच शिक्षेस स्थगिती दिली.