आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jdu Mla Gopal Mandal Embarrassing Act In Tejas Rajdhani Express, Insulted By Passengers

ट्रेनमध्ये अंडरवेअरवर फिरले JDU आमदार:तेजस राजधानी एक्सप्रेसमध्ये गोपाल मंडल यांचे लाजिरवाणे कृत्य, प्रवाशांनी आक्षेप घेतला तर शिवीगाळ केली

पटना21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नितीशकुमार यांचा पक्ष जनता दल युनायटेडचे ​​(JDU) आमदार गोपाल मंडल यांचे लाजिरवाणे कृत्य समोर आले आहे. ते गुरुवारी रात्री पाटणा (राजेंद्र नगर) पासून नवी दिल्लीकडे जात असलेल्या 02309 तेजस राजधानी एक्सप्रेसमध्ये प्रवास करत होते. या दरम्यान, ते ट्रेनमध्ये फक्त बनियान आणि अंडरवेअरमध्ये फिरताना दिसले. प्रवाशांनी तीव्र आक्षेप घेतल्यावर त्यांनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

आमदाराने चालत्या ट्रेनमध्ये खूप गोंधळ घातला. प्रवाशांच्या तक्रारीवरून, ट्रेन एस्कॉर्ट करणारी RPF टीम घटनास्थळी पोहोचली. समजूत काढल्यानंतर आमदार आपल्या A-1 कोचमध्ये निघून गेले.

स्वच्छतागृहातून परत आले, तेव्हा फक्त बनियान आणि अंडरवेअरमध्ये
आमदार गोपाल मंडल आणि त्यांचे साथीदार सीट क्रमांक 13, 14 आणि 15 वर प्रवास करत होते. जेव्हा ते स्वच्छतागृहातून परत आले, तेव्हा फक्त बनियान आणि अंडरवेअरमध्ये होते. यावर 22-23 क्रमांकावर बसलेल्या प्रवाशाने प्रल्हाद पासवान यांनी आक्षेप घेतला. पासवान आपल्या कुटुंबासह होते. ते म्हणाले की, येथे महिलाही बसल्या आहेत, त्यामुळे तुम्ही मर्यादाचे भान ठेवा. यावर आमदाराने चूक मान्य करण्याऐवजी वाद सुरु केला.

गोपाल मंडल यापूर्वीही चर्चेत राहिले आहेत
RPFच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, प्रल्हादने लेखी तक्रार केलेली नाही. गोपाल मंडल यापूर्वी देखील त्यांच्या कारनाम्यांमुळे चर्चेत राहिले आहेत. अलीकडेच त्यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांच्यावर बेकायदेशीर खंडणीचा आरोप केला होता, त्यानंतर काही दिवसांनी पत्रकार परिषदेत तेच उपमुख्यमंत्री आय लव्ह यू म्हणताना दिसले.

बातम्या आणखी आहेत...