आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • JDU National Executive Meeting In Patna; CM Nitish Kumar In Meeting News And Update

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नितीश कुमारांनी सोडले JDU चे अध्यक्षपद:RCP सिंह यांच्याकडे अध्यक्ष पदाची धुरा, राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत झाला निर्णय

पटना4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बैठकीत अरुणाचलचा मुद्दा उठला

बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी जनता दल यूनाइ​​​​​​टेड (JDU) चे अध्यक्षपद सोडले आहे. त्यांच्या जागी आता रामचंद्र प्रसाद (RCP) सिंह यांच्याकडे पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा आली आहे. पटनामध्ये जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक रविवारी पार पडली. यावेळी नितीश कुमार यांनी RCP यांच्या नावाची घोषणा केली.

मुख्यमंत्री नितीश कुमारांनी बैटकीत RCP सिंह यांच्या नावाचा प्रस्ताव दिला. यावेळी ते म्हणाले की, मी एकाचवेळी दोन पदाचे काम सांभाळू शकत नाही. नितीश यांच्या प्रस्तावावर सर्व सदस्यांनी होकार दर्शवला. नितीश यांनी बैठकीत RCP यांच्या नावाची घोषणा करताचा कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. दरम्यान, JDU तडून राज्यसभेचे खासदार RCP पक्षाचे अध्यक्ष झाल्यामुळे त्यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात मंत्री होण्याचा मार्ग बंद झाला आहे. त्यांच्या जागी आता ललन सिंह आणि संतोष कुशवाहा केंद्रात मंत्री बनू शकतात.

बैठकीत अरुणाचलचा मुद्दा उठला

JDU च्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत तमिळनाडू, केरळ, बंगाल आणि झारखंडमधील पक्षाचे नेते सहभागी झाले होते. बैठकीपूर्वी जदयू महासचिव संजय झा म्हणाले की, बैटकीत अरुणाचलच्या मुद्द्यावर चर्चा होईल. परंतू, त्याचा परिणाम बिहारच्या राजकारणावर होणार नाही. कारण, भाजपसोबतची युती फक्त बिहारमध्ये आहे. इतर राज्यात आम्ही विरोधात लढतो.

बातम्या आणखी आहेत...