आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाच्या गळ्यात अडकले जीन्सचे बटण:2 तासांच्या प्रयत्नांनंतर काढले बाहेर, डॉक्टरांनी 1 रुपयाही फी घेतली नाही

बक्सर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिहारच्या बक्सरमध्ये एका 4 वर्षांच्या मुलाच्या अन्ननलिकेत जीन्सचे बटण अडकल्याची घटना समोर आली. खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी दोन तासांच्या प्रयत्नांनतर हे बटण बाहेर काढले. सुदैवाने या मुलाचे प्राण वाचले असून यानंतर बालकांची काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

डॉक्टरांनी वाचवले मुलाचे प्राण

याविषयी सविस्तर वृत्त असे की, बक्सरच्या मुफस्सिल ठाणे हद्दीतील चौसा नरबतपूरमध्ये राहणारे मुन्ना सोनार यांचा 4 वर्षीय नातू प्रिन्स कुमारने खेळताना जीन्सचे मोठे बटण गिळले. हे बटण त्याच्या गळ्यात अडकले. यामुळे तो जोराने खोकलायला लागला. त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. यानंतर कुटुंबीयांची एकच धावपळ सुरु झाली. त्यांनी आधी स्वतःच हे बटण काढण्याचे प्रयत्न केले. मात्र मुलाची तब्येत बिघडायला लागल्यानंतर ते त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन गेले. मात्र तिथले डॉक्टर हे बटण काढू शकले नाही. नंतर त्यांनी एका खासगी रुग्णालयात मुलाला नेले. तिथे डॉक्टरांनी मुलाच्या गळ्याचा एक्स-रे काढून बटणाची जागा बघितली. नंतर काही तास प्रयत्न केल्यावर गळ्यात अडकलेले बटण काढण्यात आले. यामुळे या मुलाचे प्राण वाचले.

बटण काढल्यानंतर कुटुंबीयांच्या जीवात जीव आला.
बटण काढल्यानंतर कुटुंबीयांच्या जीवात जीव आला.

खेळताना मुलांवर लक्ष द्या

खेळताना मुलांवर लक्ष ठेवले पाहिजे असे डॉ. व्हि. के शर्मा म्हणाले. अन्यथा परिस्थिती जीवघेणी होऊ शकते असे ते म्हणाले. कुटुंबीय लवक मुलाला घेऊन आमच्याकडे आले, त्यामुळे वेळीच बटण काढण्यात यश आले. आम्ही या कुटुंबाकडून एक रुपयाही शुल्क घेतले नाही असे डॉक्टर म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...