आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • JEE Advance Result Declare : IIT Delhi Released The Result, The Process Of Admission In 23 IITs Will Start From October 6

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जेईई अॅडव्हान्स्डचा निकाल जाहीर...:कोरोननामुळे 50% घटवावा लागला कटऑफ, आजपासून 23 आयआयटीसह 97 संस्थांची कौन्सिलिंग सुरू

नवी दिल्ली/कोटा7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुण्याचा चिराग फलोर 352 गुण घेऊन ठरला ऑल इंडिया टॉपर

भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) दिल्लीने जॉइंट एट्रन्स एक्झाम (जेईई) अॅडव्हान्स्डचा निकाल जाहीर केला आहे. त्यात ३९६ पैकी ३५२ गुण घेऊन आयआयटी मुंबई झोनच्या चिराग फलोरला ऑल इंडिया रँक (एआयआर)-१ मिळाली आहे. तो पुण्याचा रहिवासी आहे. विजयवाड्याचा गंगुला भुवन आणि बिहारचा वैभव राज यांना अनुक्रमे दुसरी आणि तिसरी रँक मिळाली.

मुलींमध्ये रुरकी झोनची कनिष्का मित्तल (३९६ पैकी ३१५ गुण) टॉपर ठरली. तिची एआयआर-१७ आहे. विशेष म्हणजे कोरोनामुळे बहुधा प्रथमच कटऑफमध्ये ५० टक्क्यांची घट झाली आहे. तज्ज्ञ देव शर्मा यांनी सांगितले की, ओपन प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विषयनिहाय कटऑफ १० टक्के तर अॅग्रिगेट कटऑफ ३५ टक्के जारी झाला होता. निकालानुसार विषयनिहाय कटऑफ १० वरून घटवून ५ टक्के तर अॅग्रिगेट कटऑफ ३५ वरून घटवून १७.५ टक्के करण्यात आला. इतर स‌र्व प्रवर्गांच्या कटऑफमध्येही घट करण्यात आली. जेईई मेन परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांपैकी १,५०,८३८ विद्यार्थ्यांनी जेेईई अॅडव्हान्स्ड दिली होती. त्यापैकी ४३,२०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात ६,७०७ मुली आहेत

यंदा ७५ हजार कमी विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा...कटऑफ घटवावा लागला

दरवर्षी जेईई मेनच्या गुणांच्या आधारे जवळपास २.२५ लाख विद्यार्थी अॅडव्हान्स्डसाठी पात्र ठरतात. आयआयटीच्या जागांच्या तिप्पट विद्यार्थ्यांना कौन्सिलिंग कॉल येतो. त्यामुळे कटऑफ कमी करावा लागतो, पण ही कपात २५ ते ३०% दरम्यान राहते. यंदा २३ आयआयटीत सुमारे १३ हजार जागा आहेत. दुसरीकडे, कोविडमुळे परीक्षा देणाऱ्यांची संख्या १,५२,४४९ च राहिली.त्यामुळे कटऑफमध्ये एवढी घसरण झाली. गेल्या वर्षी कटऑफमध्ये जवळपास २५% ची घसरण झाली होती. यंदा अॅडव्हान्स्ड परीक्षा ३९६ गुणांची होती.

आजपासून २३ आयआयटीसह ९७ संस्थांची कौन्सिलिंग सुरू

जेईई एडव्हान्स २७ सप्टेंबरला झाली होती. त्याआधी १ ते ६ सप्टेंबरदरम्यान जेईई-मेन झाली होती. तीत एकूण ८.५८ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. अाता २३ आयआयटी, ३१ एनआयटी, २३ ट्रिपल आयटीसह देशभरातील ९७ संस्थांमध्ये प्रवेश प्रकिऱ्याही सुरू झाली आहे. पात्र विद्यार्थी अॅडमिशन कौन्सिलिंग प्रक्रियेत ६ ऑक्टोबरपर्यंत सहभागी होऊ शकतात.

मुली आणि मुलांच्या टॉपरमध्ये ३७ गुणांचा फरक :

ऑल इंडिया टाॅपर चिराग फलाेरने ३९६ पैकी ३५२ गुण म्हणजे ८८.८८ टक्के गुण मिळवले, तर मुलींतील टॉपर कनिष्का मित्तलला ३१५ गुण मिळाले आहेत. चिराग आयआयटी मुंबईचा, तर कनिष्का आयआयटी रूरकी झोनची आहे. इंडिया टाॅपर चिरागची जेईई मेनमध्ये १२ वी रँक आहे.

या वर्षी २५% वाढली मुलींची संख्या :

या वर्षी अॅडव्हान्स्ड क्वालिफाय करणाऱ्या मुलींची संख्या सुमारे २५% वाढली आहे. गेल्या वर्षी ५३५६ मुली अॅडव्हान्स्ड परीक्षेत उत्तीर्ण झाल्या होत्या. यंदा ६,७०७ मुली पात्र ठरल्या आहेत. विद्यार्थिनींचा एकूण निकाल २०.४१%, तर विद्यार्थ्यांचा एकूण निकाल ३०.९३% राहिला.

बातम्या आणखी आहेत...