आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेईई-ॲडव्हान्स:मृदुल टॉपर, सलग चौथ्या वर्षीही घटवला ‘आयआयटी’चा कटऑफ

जयपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेईई ॲडव्हान्सचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. आयआयटी दिल्ली झोनचा मृदुल अग्रवाल ९६.६६ टक्के गुण घेऊन प्रथम आला. राजस्थानच्या मृदुलला ३६० पैकी ३४८ गुण मिळाले. त्याने भौतिकशास्त्रात १२० पैकी १२०, रसायनशास्त्रात ११२ व गणितात ११६ गुण मिळवले. हे जेईई-अॅडव्हान्स परीक्षेतील आजवरचे सर्वाधिक गुण आहेत. आयआयटीला सलग चौथ्या वर्षी स्टँडर्ड कटऑफशी तडजोड करावी लागली. एकूणच विषयवार कटऑफ ५० टक्के कमी झाला आहे. निश्चित कटऑफ ३५ टक्के होता, तो १७.५० करण्यात आला. या वेळी ४१,८६२ विद्यार्थी पात्र ठरले. आयआयटी दिल्ली झोनची काव्या चोपडा २८६ गुण मिळवून मुलींत प्रथम आली. तिला ३६० पैकी २८६ गुण मिळाले. टॉप १०० मध्ये एकच मुलगी स्थान मिळवू शकली. टॉपर्समध्ये आयआयटी बॉम्बे झोनचा दबदबा राहिला. पहिल्या ५०० मध्ये १३७ विद्यार्थी या झोनचे आहेत.

जेईई अॅडव्हान्सचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. आयआयटी दिल्ली झोनचा मृदुल अग्रवाल ९६.६६ टक्के गुण घेऊन प्रथम आला. राजस्थानच्या मृदुलला ३६० पैकी ३४८ गुण मिळाले. त्याने भौतिकशास्त्रात १२० पैकी १२०, रसायनशास्त्रात ११२ व गणितात ११६ गुण मिळवले. हे जेईई-अॅडव्हान्स परीक्षेतील आजवरचे सर्वाधिक गुण आहेत. आयआयटीला सलग चौथ्या वर्षी स्टँडर्ड कटऑफशी तडजोड करावी लागली. एकूणच विषयवार कटऑफ ५० टक्के कमी झाला आहे. निश्चित कटऑफ ३५ टक्के होता, तो १७.५० करण्यात आला. या वेळी ४१,८६२ विद्यार्थी पात्र ठरले. आयआयटी दिल्ली झोनची काव्या चोपडा २८६ गुण मिळवून मुलींत प्रथम आली. तिला ३६० पैकी २८६ गुण मिळाले. टॉप १०० मध्ये एकच मुलगी स्थान मिळवू शकली. टॉपर्समध्ये आयआयटी बॉम्बे झोनचा दबदबा राहिला. पहिल्या ५०० मध्ये १३७ विद्यार्थी या झोनचे आहेत.

हैदराबाद १३५ विद्यार्थ्यांसह दुसऱ्या स्थानावर आहे. आयआयटी काैन्सिलिंगसाठी मागील वर्षी ६,७०७ मुली पात्र ठरल्या होत्या. या वेळी हा आकडा ६,४५२ झाला आहे. मृदुलाला आयआयटी बॉम्बेमधाून कॉम्प्युटर सायन्स करायचे आहे. त्यानंतर एमआयटीसारख्या जगातील टाॅप युनिव्हर्सिटीमध्ये शिकायचे आहे.

सातच परदेशी विद्यार्थी यशस्वी
जेईई अॅड.साठी ९७ विदेशी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ४२ जणांनी परीक्षा दिली. सात विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

का कमी केला जातो स्टँडर्ड कटऑफ ?
आयआयटी काैन्सिलिंगसाठी प्रति जागांसाठी सरासरी तीन विद्यार्थ्यांना बोलावले जाते. स्टँडर्ड कटऑफ बदलला नाही तर आवश्यक विद्यार्थी (सुमारे तीनपट) पात्र होऊ शकत नाहीत. कटऑफ कमी केल्याने जास्त विद्यार्थी काैन्सिलिंगसाठी पात्र ठरतात. काैन्सिलिंगसाठी एग्रीगेट स्टँडर्ड कटऑफ कॉमन रँक लिस्टसाठी ३५ टक्के, जनरल ईडब्ल्यूएस आणि ओबीसी एनसीएलसाठी ३१.५, एससी, एसटी व इतरांसाठी १७.५ टक्के आहे. देशात एकूण २३ आयआयटीमध्ये १६,०५३ जागा आहेत.

बातम्या आणखी आहेत...