आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेईई मेन:2021 तिसऱ्या सत्राचा निकाल जाहीर, 17 उमेदवारांना 100 पर्सेंटाइल मिळाले

कोटा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) जेईई मेन तिसरे सत्र २०२१ चा निकाल शुक्रवारी रात्री उशिरा जाहीर केला. या परीक्षेत १७ उमेदवारांना १०० पर्सेंटाइल मिळाले आहे. त्यात आंध्र प्रदेश आणि तेलंगणच्या प्रत्येकी ४ उमेदवारांचा, हरियाणा आणि यूपीच्या प्रत्येकी २ आणि बिहार, राजस्थान तसेच कर्नाटकच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा समावेश आहे.

आंध्र प्रदेशमधून कर्णम लोकेश, डी. व्ही. पनीश, पी. व्ही. शिवा, के. आर. नायडू, तेलंगणमधून पोलू लक्ष्मी, साई लोकेश रेड्डी, व्ही. वेंकटा आणि बिहारचा वैभव विशाल, दिल्लीचा रुचिर बन्सल, प्रवर कटारिया, हरियाणातील हर्ष, अनमोल, कर्नाटकमधील गौरव दास, राजस्थानमधील अंशुल वर्मा, उत्तर प्रदेशातील पी. अग्रवाल आणि अमैया सिंघल यांनी १०० पर्सेंटाइल मिळवले आहे.

बातम्या आणखी आहेत...