आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • JEE Main Exam 2020 Paper Exam; Joint Entrance Examination News And Student Reactions From Exam Centres

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजपासून जेइइ मेन्स परीक्षेला सुरुवात:विद्यार्थ्यांना थर्मल स्क्रीनिग नंतर प्रवेश, 6 सप्टेंबर पर्यंत असेल परीक्षा; फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होण्यासाठीही सुविधा

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सर्व मुख्यमंत्र्यांना विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याचे केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांचे आवाहन

अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा (जेईई-मेन्स) आजपासून सुरू होत आहे. कोरोना संकटात परीक्षा स्थगित करण्याची मागणी फेटाळून लावणाऱ्या राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीने परीक्षा घेण्यासाठी सर्व व्यवस्था केली आहे. परीक्षा केंद्रांवर कोरोना संसर्ग टाळण्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होण्यासाठीही सुविधा करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

ते म्हणाले, मी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याचे आणि त्यांना योग्य सुविधा पुरवण्याचे आवाहन करतो. दरम्यान, परीक्षा सुरू होण्याच्या काही तासांपूर्वीच परीक्षा स्थगित करण्याची मागणी करण्यात आली आहे. जेईई देणाऱ्या 17 वर्षीय विद्यार्थ्याने सरन्यायाधीश एस.ए.बोबडे यांना पत्र लिहून कोरोना व पूरस्थिती लक्षात घेता जेईई व नीट स्थगित करण्याची मागणी केली होती.