आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एनटीएची घोषणा:पुढील वर्षी 4 वेळा होणार जेईई मेन मात्र, परीक्षेच्या तारखा निश्चित नाही

कोटा7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मेमध्ये होणार परीक्षा; यंदा पॅटर्नमध्ये आहे मोठा बदल

देशातील सर्वात मोठी अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा जेईई मेन-२०२१ बाबत नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) मंगळवारी स्पष्टीकरण दिले. वेबसाइटवरील सूचनेनुसार, आता पुढील वर्षी फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे अशा ४ वेळा जेईई-मेन परीक्षा होतील. सूत्रांनुसार, परीक्षेच्या तारखा निश्चित न झाल्याने एनटीएने रात्री उशिरा वेबसाइटवरून सूचना हटवली. करिअर काउन्सेलिंग एक्स्पर्ट देव शर्मा म्हणाले, परीक्षा बदललेल्या पॅटर्नमध्ये होईल. ३२९ शहरांत जेईई-मेन परीक्षा दोन टप्प्यांत घेतली जाण्याची शक्यता आहे.

यंदा पॅटर्नमध्ये हा आहे मोठा बदल

> ९० प्रश्न असतील {पेपर २ भागांत असेल. फिजिक्स, केमिस्ट्री व मॅथ्समध्ये सेक्शन ए व सेक्शन बी असेल. सेक्शन एमध्ये प्रत्येक विषयात २० बहुपर्यायी प्रश्न असतील

> सेक्शन बीमध्ये न्यूमेरिकल व्हॅल्यू बेस्ड १० प्रश्न असतील

> या १० पैकी कोणतेही ५ प्रश्न सोडवावे लागतील

> एकूण ९० पैकी ७५ प्रश्न सोडवण्याची संधी असेल

> प्रत्येक प्रश्न ४ गुणांचा असेल

> बहुपर्यायी प्रश्नांचे अचूक उत्तर दिल्यास ४ गुण, उत्तर चुकल्यास निगेटिव्ह मार्किंग असेल.

बातम्या आणखी आहेत...