आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JEE Main May 2021:मे महिन्यात होणारी जेईई मेनची परीक्षा पुढील आदेशापर्यंत स्थगित

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मे महिन्यात होणारी जेईई मेन 2021 ची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. या संदर्भात नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए)ने नोटीस काढली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरीयल निशंक यांनी याबाबतची माहिती ट्वीट करून दिली आहे. एनटीएने म्हटले आहे की, जेईई मेन 2021 (JEE Mains 2021) ची दोन सत्रातील परीक्षा फेब्रुवारी आणि मार्चमध्ये घेण्यात आली आहे.

एप्रिल महिन्यात 27, 28 आणि 30 तारखेला परीक्षा होणार होती. परंतु कोविड -19च्या वाढत्या प्रकरणांमुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. आता जेईई मेन मे 2021 ची परीक्षाही पुढे ढकलली जात आहे. ही परीक्षा 24 ते 28 मे 2021 दरम्यान घेण्यात येणार होती. परंतु सध्याची कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

जेईई मेन मे 2021च्या सत्रासाठी नोंदणीही सुरू झाली नव्हती. एनटीएने सांगतिले आहे की नोंदणीची तारीख देखील नंतर जाहीर केली जाईल. विद्यार्थ्यांनी हा अतिरिक्त वेळ चांगल्या तयारीसाठी वापरावा, असा सल्लाही देण्यात आला आहे. NTA Abhyas App च्या माध्यमातून घरी बसून मॉक टेस्टचा सराव करा.

बातम्या आणखी आहेत...