आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक:जेईई मेन, नीट परीक्षांच्या तारखांची आज घोषणा, परीक्षांची नियमावली लवकरच जारी होणार

नवी दिल्ली 3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सीबीएसई परीक्षांच्या तारखा शुक्रवारी जाहीर होण्याची शक्यता

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक हे मंगळवारी जेईई मेन आणि नीट परीक्षांच्या तारखा जाहीर करतील. सुमारे १० हजार विद्यार्थी-पालकांच्या उपस्थितीत एका वेबिनारद्वारे या तारखांची घोषणा करण्यात येईल. नॅशनल टेस्टिंग एजन्सीनुसार (एनटीए) सुमारे १५ लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, परीक्षा केंद्रावर पूर्वीच विद्यार्थी दूर अंतरावर बसतात, ते फिजिकल डिस्टन्सिंगप्रमाणेच होते. त्यामुळे परीक्षा केंद्रांच्या संख्येवर फारसा परिणाम होणार नाही. 

मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, परीक्षेबाबतची नियमावली तयार आहे.ही घोषणा शुक्रवारी होण्याची शक्यता आहे. यात परीक्षेच्या काळात मास्क लावणे, फिजिकल डिस्टन्सिंगसारख्या आवश्यक बाबींचा समावेश करण्यात येईल. ही नियमावली विद्यापीठ स्तरावरील परीक्षांसाठीही राहील. अधिकाऱ्यांच्या मते, सीबीएसईच्या १० वी आणि १२ वीच्या उर्वरित परीक्षांच्या तारखाही शुक्रवारी जाहीर होईल.

बातम्या आणखी आहेत...