आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • JEE Main Session 2 Results Live Updates । More Than 6 Lakh Students Appeared For Exam, How To Check The Results

JEE मेन सेशन-2 चा निकाल जाहीर:6 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दिली होती परीक्षा, असा चेक करा निकाल

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने JEE मेन सेशन-2 परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. JEE मेनमध्ये बसलेले विद्यार्थी NTAच्या अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर त्यांचा निकाल पाहू शकतात. उमेदवारांना त्यांचा रोल नंबर आणि जन्मतारीख यांच्या मदतीने वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल आणि त्यांचे स्कोअरकार्ड डाउनलोड करावे लागेल.

यापूर्वी रविवारी, नॅशनल टेस्टिंग एजन्सीने सेशन 2 साठी JEE मुख्य अंतिम आन्सर की जारी केली होती. JEE मेनची परीक्षा 30 जुलै रोजी झाली होती. यंदा सत्र-2च्या परीक्षेसाठी 6.29 लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

JEE मेन सेशन 2 चा निकाल असा करा चेक

  • निकाल तपासण्यासाठी, उमेदवार प्रथम NTA च्या अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in आणि ntaresults.nic.in ला भेट द्यावी.
  • त्यानंतर मुख्यपृष्ठावर दिसणार्‍या JEE मेन सेशन 2च्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
  • नंतर आवश्यक माहिती प्रविष्ट करून लॉग इन करा.
  • यानंतर उमेदवाराचे स्कोअरकार्ड स्क्रीनवर दिसेल.
  • आता स्कोअरकार्ड डाउनलोड करावे.
  • अखेरीस उमेदवारांनी स्कोअर कार्डची प्रिंट आउट घ्यावी.
बातम्या आणखी आहेत...