आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोटा:जेईई मेन्सचा निकाल जाहीर, 24 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाइल, यात सर्वाधिक 8 जण तेलंगणातील आहेत

कोटा2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एनटीएने 1 ते 6 सप्टेंबर या कोरोनाकाळात ही परीक्षा घेतली होती

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) शुक्रवारी रात्री उशिरा जेईई मेन्स-२चा निकाल जाहीर केला. यात २४ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल मिळाले आहे. यात सर्वाधिक 8 जण तेलंगणातील आहेत. महाराष्ट्रातील शशांक चोबे याचा यात समावेश आहे.

रात्री उशिरापर्यंत जेईई अॅडव्हान्ससाठी कटऑफ मात्र जाहीर करण्यात आला नव्हता. गेल्या वर्षी जनरल कॅटेगरीचा कटऑफ स्कोअर ८९.७५ होता. तर ओबीसींचा ७४ होता. हा निकाल जाहीर झाल्यानंतर देशातील १०० संस्थांमधील प्रवेशासाठी कौन्सिलिंग सुरू होते. यात २३ आयआयटी, ३१ एनआयटी, २५ ट्रिपल आयटी आणि २८ जीएफटीआय या प्रतिष्ठित संस्थांचा समावेश आहे.

कोरोना काळात झाली परीक्षा...
एनटीएने 1 ते 6 सप्टेंबर या कोरोनाकाळात ही परीक्षा घेतली होती. या वेळी फिजिकल डिस्टन्सिंगसह कोरोनाशी संबंधित सुरक्षेचे सर्व उपाय करण्यात आले होते. जेईई मेनचा निकाल मार्क्स नॉर्मलायझेशन पद्धतीने लावला जातो. ही परीक्षा अनेक टप्प्यात झाली होती त्यामुळे काही विद्यार्थ्यांना हे पेपर सोपे गेले असतील तर काहींना कठीण गेली असेल. यात कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये म्हणून हा निकाल व रँक निश्चित करण्यासाठी खास मार्क्स नॉर्मलायझेशन सूत्र वापरले जाते.

बातम्या आणखी आहेत...