आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेईई मेन्स:जेईई मेन्स सेशन-1 परीक्षा आता 23 ते 29 जूनपर्यंत

जयपूर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जेईई मेन सेशन-१ च्या तारखांत पुन्हा बदल केला आहे. आता जेईई मेन्सचे पहिले सत्र २० ऐवजी २३ जूनपासून सुरू होऊन २९ जूनपर्यंत चालेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेचे शहर आणि परीक्षांची तारीखही सांगितली आहे. बहुतांश विद्यार्थ्यांना परीक्षेच्या शहराची पहिलीच पसंती दिली आहे. परीक्षाचे स्लॉट आणि परीक्षा केंद्राची माहिती जारी केलेली नाही. आतापर्यंत प्रवेश पत्रही जारी केलेले नाही. शिक्षण तज्ज्ञ देव शर्मा यांनी सांगितले की, सेशनचे दिवस कमी केल्याने आता २० ऐवजी १४ स्लॉटच ठेवले आहेत. एका दिवसात दोन स्लॉटमध्ये परीक्षा आयोजित केली जाईल. आधी हे सेशन २० ते २९ जूनपर्यंत आयोजित केले होते. दुसरीकडे, एनटीएने नीट यूजीच्या कॅटेगरीतील दुरुस्तीसाठी विद्यार्थ्यांना आणखी एक संधी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...