आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • JEE NEET ExamEducation Minister Ramesh Pokhriyal Nishank Said, In Any Case, There Should Be An Examination, The Opinion Of Students

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परीक्षा:शिक्षण मंत्रालय म्हणते - जेईई-नीट होणारच, शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक म्हणाले, कोणत्याही स्थितीत परीक्षा व्हावीच, असे विद्यार्थ्यांचे मत

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आतापर्यंत 17 लाख अॅडमिट कार्ड डाऊनलोड

कोरोना काळात जेईई मेन्स -२०२० आणि नीट परीक्षा घेण्याबाबत सरकार आणि विरोधी पक्ष समोरासमोर आले आहेत. दरम्यान, या परीक्षा रद्द होणार नाहीच, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. एका इंग्रजी वेबसाइटने सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे की, नीट व जेईई निर्धारित तारखेलाच होणार असल्याचे शिक्षण सचिवांनी स्पष्ट सांगितले आहे. दाेन्ही परीक्षा स्थगित करण्यावर आता फेरविचार केला जाणार नाही. शिक्षण सचिवांनी हे वक्तव्य शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या परीक्षेबाबतच्या व्हिडिओ निवेदनाच्या तासाभरापूर्वी केले.

यानंतर शिक्षणमंत्री पोखरियाल म्हणाले, ‘जेईईच्या ७.५ लाख आणि नीटच्या १५.९७ लाखपैकी १० लाख विद्यार्थ्यांनी अॅडमिट कार्डही डाऊनलोड केले आहे. यातून कोणत्याही स्थितीत परीक्षा आयोजित व्हावी, हीच विद्यार्थ्यांची इच्छा असल्याचे दिसते.’

रस्सीखेच : परीक्षा घेण्याची योजना : एमपी; पंजाब म्हणाले, सुप्रीम कोर्टात जात अाहोत

  • काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या नेतृत्वात बुधवारी ७ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी परीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी केली होती. पंजाबचे सीएम कॅप्टन अमरिंदर यांनी अॅडव्होकेट जनरल (एजी) अतुल नंदा यांना निर्देश दिले आहेत. त्यानुसार, बिगर भाजपशासित राज्यांशी समन्वय साधून परीक्षा टाळण्यावर फेरविचाराची विनंती करण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल कराव्यात.
  • दुसरीकडे, मध्य प्रदेश सरकार सप्टेंबरमध्ये परीक्षा घेण्याची योजना आखत असल्याचे सांगितले आहे. पहिल्या टप्प्यात नीट सेंटरची संख्या दुप्पट करत आहोत. जेणेकरून विद्यार्थ्याना झडती देण्याची गरज पडू नये.

शिक्षणतज्ज्ञ म्हणाले, परीक्षा टाळणे हे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्यासारखे
परीक्षेच्या समर्थनार्थ दिल्ली, जेएनयू, कॅलिफोर्निया विद्यापीठासह देश-विदेशातील विद्यापीठातील १०० पेक्षा शिक्षणतज्ज्ञांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. त्यानुसार, ‘या परीक्षांना उशीर झाला तर ते विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळल्यासारखे असेल.’

  • अनेक आयआयटी संस्थांचे संचालक म्हणाले की, नीट आणि जेईई परीक्षांना आणखी विलंब केल्यास ‘शून्य शैक्षणिक सत्र’चा धोका आहे. इतर पर्यायाचा अवलंब केल्यास शिक्षणाची गुणवत्ता कमी होईल आणि त्याचा नकारात्मक परिणाम होईल.