आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन वर्षांनी उड्डाण:जेट एअरवेजच्या विमानाचे तीन वर्षांनी उड्डाण

हैदराबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेट एअरवेजच्या विमानाने तीन वर्षांनी हैदराबादमध्ये उड्डाण केले. हे चाचणी उड्डाण १ तास ३८ मिनिटे आकाशात राहिले. कंपनीचे सीईओ संजीव कपूर यांनी सोशल मीडियावर सांगितले की, जेटचे कामकाज पुन्हा सुरू करण्यासाठी कठोर परिश्रम घेणाऱ्या सर्वांसाठी चाचणी उड्डाण हा भावनिक क्षण होता.

जेटच्या चाचणी विमानाने ५ मे रोजी उड्डाण केले आणि विशेष म्हणजे जेट एअरवेजने २९ वर्षांपूर्वी याच तारखेपासून विमानसेवा सुरू केली होती. काही वर्षांपूर्वीपर्यंत ही देशातील सर्वात मोठी विमान कंपनी होती. २०१७ आर्थिक स्थिती बिघडू लागली वाढत्या कर्जाच्या ओझ्यामुळे कंपनीला एप्रिल २०१९ मध्ये कामकाज बंद करावे लागले.

कंपनी दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून गेली. अखेरीस ते संयुक्त अरब अमिरातमधील उद्योगपती मुरारी लाल जालान व ब्रिटनची काॅलराॅक कंपनी यांच्या नेतृत्वाखालील संघाने खरेदी केली. जेट एअरवेजची पुन्हा एकदा हवाई वाहतूक सुरू झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...