आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएका उंदराने दागिण्यांच्या दुकानात जाऊन डायमंड नेकलेस चोरला, असे सांगितल्यास तुमचा विश्वास बसणार नाही. तुम्ही असे सांगणाऱ्यास वेड्यात काढाल. पण खरेच... प्रत्यक्षात ही घटना घडली आहे. तसेच या चोरीचा एक व्हिडिओही सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे.
30 सेकंदांच्या या व्हिडिओत एक उंदीर उडी मारून ज्वेलरी शॉपमध्ये ठेवण्यात आलेल्या डायमंड नेकलेसवर बसतो. त्यानंतर तो क्षणार्थात नेकलेस डिस्प्लेमधून काढून गायब होतो.
हा व्हिडिओ IPS अधिकारी हिंगणकर यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. ते व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हणाले - आता या उंदराने हिऱ्याचा हार कोणासाठी घेतला असेल? या व्हिडिओला आतापर्यंत 90 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.
एका युजरने कमेंटमध्ये लिहिले - त्याने आपल्या बायकोसाठी हा हार चोरला असावा. दुसऱ्या एका युजरने म्हटले की, बायको त्याच्याकडे नेकलसाठी हट्ट धरत असेल. काही लोकांनी तर हा उंदीर व्हॅलेंटाईन डेची तयारी करत असल्याचाही दावा केला आहे.
दिव्य मराठीच्या इतर बातम्या वाचा...
तामिळनाडूत बँक लुटण्यासाठी फिल्मी स्टाइलमध्ये आला:बंदूक काढून लोकांना धमकावू लागला, वृद्धाने पकडले
तामिळनाडूमध्ये एक व्यक्ती फिल्मी स्टाइलमध्ये बुरखा घालून बँक लुटण्यासाठी गेला होता, पण त्याचा प्रयत्न फसला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. ही घटना शनिवारी धारापुरम भागातील कॅनरा बँकेची आहे. बुरखा घातलेला एक व्यक्ती बँकेत शिरला आणि काही वेळ इकडे तिकडे फिरत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी...
ऑनलाइन सट्टा-लोन अॅपवर केंद्राचा बडगा:IT मंत्रालय 138 बेटिंग अॅप्स आणि 94 लोन अॅप्स ब्लॉक करणार, चीनशी आहे कनेक्शन
चायनीज लिंक्ससह बेटिंग आणि कर्ज देणार्या अॅप्सवर एक मोठे पाऊल उचलत केंद्र सरकारने 138 बेटिंग अॅप्स आणि 94 कर्ज देणार्या अॅप्सना ब्लॉक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सूत्रांनी सांगितले की, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला (MeitY) केंद्रीय गृह मंत्रालयाकडून या अॅप्सना ब्लॉक करण्याचे निर्देश या आठवड्यात मिळाले आहेत. सूत्रांनीदेखील दुजोरा दिला आहे की, MeitY ने हे अॅप्स ब्लॉक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.