आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jharkhand Ankita Singh Murder Case Updates । Demand For Action On SDPO । Governor Ordered An Inquiry Into The Role Of Police

अंकिताचे अखेरचे शब्द- मी जशी मरणार, तसाच शाहरुखही मरावा:मृत्यूपूर्वी म्हणाली- पहाटे खिडकीतून पेट्रोल फेकून लावली होती आग

रांची3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

झारखंडच्या दुमका येथील अंकिताला तिला जाळणाऱ्या शाहरुखला फाशीची शिक्षा हवी होती. मृत्यूपूर्वी दिलेल्या जबाबात ती म्हणाली– ज्या प्रकारे मी त्याच्यामुळे मरत आहे, तशीच शिक्षा त्यालाही मिळायला हवी. जेव्हा पत्रकाराने विचारले- तुमची अशी इच्छा आहे का, ती म्हणाली होती- हो.

अंकिताने या घटनेची संपूर्ण कहाणी कॅमेऱ्यासमोर सांगितली. रात्री 10 वाजता तिने वडिलांना शाहरुखच्या धमकीबद्दल सांगितले. पप्पा म्हणाले होते की सकाळी बघू. पहाट होण्यापूर्वी अंकिताला जिवंत जाळण्यात आले. पहाटे चारच्या सुमारास शाहरुखने खिडकीतून पेट्रोल टाकून तिला पेटवले. अंकिताने सांगितले की, तिने खिडकी उघडून पाहिले होते, शाहरुखसोबत दुसरा मुलगा छोटू होता.

शाहरुखने खिडकीतून पेट्रोल टाकून लावली होती आग

23 ऑगस्ट रोजी अंकिता दुमका येथील जरुवाडीह परिसरात तिच्या घरात झोपली होती. त्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास शेजारील शाहरुख हुसेन याने खिडकीतून पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. 5 दिवसांच्या उपचारानंतर तिचा मृत्यू झाला.

एडीजी मुरारी लाल मीना यांनी अंकिता सिंहच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
एडीजी मुरारी लाल मीना यांनी अंकिता सिंहच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

2 वर्षांपासून त्रास देत होता शाहरुख

शाहरुख 2 वर्षांपासून अंकिताचा छळ करत होता. मैत्रीसाठी दबाव आणत होता. याबाबत अंकिताने तिच्या वडिलांकडे तक्रारही केली होती, मात्र बदनामीच्या भीतीने त्यांनी पुढचे पाऊल उचलले नाही. यानंतर शाहरुख जास्तच त्रास देऊ लागल्यावर ते पोलिसांत तक्रार करायला गेले, मात्र शाहरुखच्या मोठ्या भावाने माफी मागितली. यापुढे असे करणार नसल्याचे सांगितले. काही दिवस शांत राहिल्यानंतर पुन्हा त्याचे गैरवर्तन सुरू झाले. मागच्या 15 दिवसांपासून तो अंकिताला खूप त्रास देऊ लागला.

एसडीपीओ अंकिताला सज्ञान म्हणाले होते, पण तिच्या प्रमाणपत्रानुसार ती 16 वर्षांची होती.
एसडीपीओ अंकिताला सज्ञान म्हणाले होते, पण तिच्या प्रमाणपत्रानुसार ती 16 वर्षांची होती.

एसडीपीओ नूर मुस्तफा यांच्याकडून तपास काढला

अंकिता हत्याकांडात पक्षपाताच्या आरोपांनी घेरलेले एसडीपीओ नूर मुस्तफा यांना या प्रकरणाच्या तपासातून हटवण्यात आले आहे. शाहरुखला संरक्षण दिल्याचा आरोप मुस्तफावर होत होता. दुसरीकडे झारखंडचे माजी मुख्यमंत्री बाबुलाल मरांडी यांनी दोषींवर 302 अन्वये हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांनी अंकिताच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांनी अंकिताच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

मृत्यूनंतर अनेक जिल्ह्यांत निदर्शने

अंकिता सिंहच्या मृत्यूनंतर केवळ दुमकाच नाही तर रांची, गिरीडीहसह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही निदर्शने झाली. दुमका येथे बजरंग दल, भाजपसह अनेक सामाजिक संघटनांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. त्याचवेळी रांचीतील फिरायालाल चौक आणि मोराबादीतील बापू वाटिकासमोरही सामाजिक संघटनांनी निदर्शने केली. या घटनेचा संताप गिरिडीहमध्येही पाहायला मिळाला.

अंकिताच्या कुटुंबाला मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी 10 लाख आणि राज्यपालांनी 2 लाख रुपयांची मदत दिली.
अंकिताच्या कुटुंबाला मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी 10 लाख आणि राज्यपालांनी 2 लाख रुपयांची मदत दिली.

अंकिताला व्हायचे होते IPS

अंकिता सिंह तीन भावंडांमध्ये मधली होती. मोठ्या बहिणीचे लग्न झालेले आहे, तर 12 वर्षांचा लहान भाऊ सध्या शिक्षण घेत आहे. अंकिताला IPS व्हायचे होते. तिच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. वडील एका बिस्किट कंपनीत सेल्समन म्हणून काम करतात. कुटुंबात आजी-आजोबा आहेत. गेल्याच वर्षी तिच्या आईचे निधन झाले होते.

बातम्या आणखी आहेत...