आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jharkhand BJP Leader Seema Patra Case Updates ।Disabled Young Woman Freed And Admitted To RIMS, Case Registered

IASच्या पत्नीने 8 वर्षे डांबून ठेवले:दिव्यांग तरुणीची भयंकर छळातून सुटका, म्हणाली- त्यांनी जिभेने फरशी साफ करायला लावली!

रांची3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

झारखंडमधील दुमका येथे अंकिताला जाळून मारल्याच्या घटनेनंतर आता आदिवासी अपंग मुलीच्या भयंकर छळाची घटना समोर आली आहे. रांची येथील निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या पत्नी भाजप नेत्या सीमा पात्रा यांच्या घरातून एका अपंग आदिवासी मुलीची सुटका करण्यात आली आहे. सीमा पात्रा यांनी गेल्या 8 वर्षांपासून मुलीला जबरदस्तीने घरात डांबून ठेवले होते.

अनेक वर्षांपासून तिने सूर्यप्रकाशही पाहिला नसल्याचे मुलीने पोलिसांना सांगितले. तिला धड जेवणही दिले जात नव्हते. तिचा एवढा छळ करण्यात आला की तिला चालताही येत नव्हते. ती जमिनीवर रांगत चालायची. लघवी खोलीच्या बाहेर गेली, तर जिभेने फरशी साफ करायला लावली जायची.

मालक एवढा निष्ठूर होता की त्याने रॉडने मारून तिचे दात तोडले. कधी-कधी गरम तव्याने तो चटके देत असे. मुलीच्या जळालेल्या चेहऱ्यावर अजूनही जखमा आहेत.

घरी जायचे म्हटले तर मालक मारायचा

पात्रा दाम्पत्य रांचीच्या व्हीआयपी परिसर अशोक नगरमध्ये राहते. पीडित मुलगी सुनीता हिने सांगितले की, ती गुमला येथील रहिवासी आहे. सीमा पात्रा यांना दोन मुले आहेत. मुलीला दिल्लीत नोकरी लागल्यावर ती 10 वर्षांपूर्वी घरच्या कामासाठी दिल्लीला गेली. ती 6 वर्षांपूर्वी रांचीला परत आली. तिचा सुरुवातीपासूनच छळ होत होता. तिला नोकरी सोडायची होती, पण तिला 8 वर्षे घरात डांबून ठेवण्यात आले. तिने घरी जाण्याबद्दल म्हटले असता तिला बेदम मारहाण करण्यात यायची. ती आजारी असताना तिच्यावर उपचारही झाले नाहीत.

तरुणीने सांगितले की, सीमा पात्रा तिला मारहाणही करत असत.
तरुणीने सांगितले की, सीमा पात्रा तिला मारहाणही करत असत.

पात्रा दाम्पत्याच्या कैदेतून अशी झाली मुलीची सुटका

एके दिवशी सुनीताने विवेक आनंद बस्के नावाच्या सरकारी कर्मचाऱ्याला मोबाइलवर मेसेज करून आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराची माहिती दिली होती. माहितीवरून आरगोरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. रांची पोलिस आणि जिल्हा प्रशासनाच्या पथकाने 29 वर्षीय तरुणीची सुटका केली होती.

महिलेने सीमा पात्रा यांच्यावर रॉडने मारल्याचा आरोपही केला आहे.
महिलेने सीमा पात्रा यांच्यावर रॉडने मारल्याचा आरोपही केला आहे.

'बेटी बचाओ-बेटी पढाओ' अभियानाच्या राज्य समन्वयक होत्या सीमा

सीमा पात्रा या माजी IAS महेश्वर पात्रा यांच्या पत्नी आहेत. महेश्वर पात्रा हे राज्यातील आपत्ती व्यवस्थापन विभागात सचिव म्हणून कार्यरत आहेत. आणि विकास आयुक्त पदावरून निवृत्त झाले. सीमा पात्रा याही भाजपच्या नेत्या होत्या. त्यांना पक्षाने बेटी बचाओ-बेटी पढाओ मोहिमेचे राज्य निमंत्रकही बनवले होते. मात्र, हे प्रकरण समोर आल्यानंतर सीमा पात्रा यांची भाजपने पक्षातून हकालपट्टी केली आहे.

डांबून ठेवलेल्या महिलेच्या अंगावर जखमेच्या खुणा आढळून आल्या.
डांबून ठेवलेल्या महिलेच्या अंगावर जखमेच्या खुणा आढळून आल्या.

एससी-एसटी कलमांतर्गत गुन्हा दाखल

सीमा पात्राविरुद्ध रांचीच्या अरगोरा पोलिस ठाण्यात एससी एसटीच्या वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच आयपीसीच्या विविध कलमान्वयेही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी हटियाचे डीएसपी राजा मित्रा यांना या प्रकरणाचे आयओ बनवण्यात आले आहे. पोलीस पीडितेची वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त होण्याची वाट पाहत आहेत जेणेकरून तिचा जबाब नोंदवला जाऊ शकेल.

भाजपच्या 'बेटी बचाओ-बेटी पढाओ' उपक्रमाच्या राज्य समन्वयक असलेल्या सीमा यांची पक्षाने आता हकालपट्टी केली आहे.
भाजपच्या 'बेटी बचाओ-बेटी पढाओ' उपक्रमाच्या राज्य समन्वयक असलेल्या सीमा यांची पक्षाने आता हकालपट्टी केली आहे.

रिम्समध्ये सुरू आहेत उपचार

पीडित सुनीताची सुटका केल्यानंतर तिला रिम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त झाल्यानंतर पीडितेला न्यायालयात हजर केले जाईल, त्यानंतर 164चा जबाब नोंदवला जाईल. पीडित सुनीताच्या सुरक्षेसाठी दोन महिला सुरक्षा कर्मचारीही तैनात करण्यात आल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...