आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CM सोरेन यांची ED चौकशीला दांडी:म्हणाले - मुख्यमंत्री काही खेळणे नाहीत, जनतेत जाणार; तपास यंत्रणांचा दुरुपयोग सुरू

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना समन्स बजावल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. ईडीने गुरुवारी सकाळी 11 वा. मनी लाँड्रिंग व अवैध उत्खननाप्रकरणी चौकशीसाठी त्यांना बोलावले होते. पण ते चौकशीसाठी गेले होते. दुसरीकडे, त्यांच्या या भूमिकेमुळे ईडी कार्यालयातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

दुसरीकडे, बुधवारी रात्री झालेल्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीतच मुख्यमंत्री सोरेन गुरुवारी ईडीपुढे हजर होणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. बैठकीत सहभागी अनेक आमदार व मंत्र्यांनी हा सरकारला अस्थिर करण्याचा कट असल्याचा आरोप केला होता.

तेथून बाहेर पडल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, मुख्यमंत्री एखादे खेळणे नाहीत. यावर काय करता येईल यासाठी आम्ही कायदेशीर सल्ला घेत आहोत. मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या शेड्यूलनुसार सोरेन आज छत्तीसगडला जाणार आहेत. तिथे ते रायपूरमध्ये होणाऱ्या आदिवासी नृत्य महोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होतील.

सरकारला अस्थिर करण्याचा कट

मुख्यमंत्री निवासस्थानी बुधवारी सायंकाळी झालेली सत्ताधारी आमदारांची बैठक रात्री उशिरापर्यंत चालली. बैठकीचे नेतृत्व करणाऱ्या हेमंत सोरने यांनी सर्वच पैलूंवर चर्चा केली. बैठकीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, बन्ना गुप्तांसह अनेक नेत्यांनी संपूर्ण घटनाक्रम भाजपचे कारस्थान असल्याचा आरोप केला. तसेच तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचाही आरोप केला.

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनीही बुधवारी साहिबगंजमध्ये बोलताना विरोधकांच्या विनंतीनुसार आपली ईडी चौकशी सुरू असल्याचे सांगितले. बैठकीनंतर बन्ना गुप्ता म्हणाले - आम्ही सर्वजण एकजूट आहोत. आम्ही जनतेच्या न्यायालयात जावून राज्य सरकार अस्थिर करण्याच्या कटाचा पर्दाफाश करणार.

सत्ताधारी पक्षाच्या आमदारांची मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी चाललेली बैठक रात्री उशिरापर्यंत चालली.
सत्ताधारी पक्षाच्या आमदारांची मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी चाललेली बैठक रात्री उशिरापर्यंत चालली.

आमदारांनी दाखवली ऐक्य

सर्वच नेत्यांनी एका सुरात म्हटले की, सरकराला अस्थिर करण्यात व्यस्त असणाऱ्या राज्यपाल व केंद्रीय यंत्रणांच्या दुरुपयोगाविरोधात सुनियोजित आंदोलन केले जाील. बैठकीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राजेश ठाकूर म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचा रायपूर दौरा पूर्वनियोजित आहे. त्यात कोणताही बदल होणार नाही. ईडीला यासंबंधी कळवण्यात येईल.

5 नोव्हेंबरपासून जनांदोलन होणार सुरू

मुख्यमंत्री निवासस्थानी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला की, 5 नोव्हेंबरपासून आंदोलन सुरू होईल. या बैठकीपूर्वी पक्षाचे केंद्रीय सरचिटमईस सुप्रियो भट्टाचार्य यांनीही एका पत्रकार परिषदेद्वारे पक्ष आपल्या अंदाजात येऊन आंदोलन करणार असल्याचे सांगिलते. बैठकीनंतर सर्वच नेत्यांनी राज्यपाल रमेश बैस व सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तपास यंत्रणांविरोधात लोकशाहीपद्धतीने आंदोलन करण्याचा निश्चय केला. सत्ताधारी आघाडीतील सर्वच घटक पक्ष जिल्हा पातळीवर होणाऱ्या या आंदोलनांत सहभागी होणार आहेत.

बैठकीत पुढील रणनीतीवर सल्लामसलत करण्यात आली.
बैठकीत पुढील रणनीतीवर सल्लामसलत करण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...