आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jharkhand CM Hemant Sorens Assembly Membership In Danger । EC Sent Report To Governor

झारखंडच्या मुख्यमंत्र्यांची खुर्ची धोक्यात:विधानसभा सदस्यत्व रद्द होण्याची शक्यता, ECचे राज्यपालांना पत्र

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याबाबत निवडणूक आयोगाने आपले मत राज्यपालांना पाठवले आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, सोरेन यांच्या पदाचा गैरफायदा घेतल्याच्या आरोपांच्या आधारे आयोगाने हे मत पाठवले आहे. राज्यपाल काही वेळात आपला निर्णय देऊ शकतात. माजी मुख्यमंत्री रघुवर दास यांनी पत्रकार परिषदेत हेमंत सोरेन यांच्यावर पदाचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता.

लोकप्रतिनिधी कायद्याचे उल्लंघन

ते म्हणाले होते की, सोरेन यांनी रांची येथील दगड खाणीच्या भाडेपट्ट्यासाठी मंजुरी मिळवली होती. खाण खात्याच्या कागदपत्रांबाबत रघुवर दास यांनी हेमंत सोरेन यांच्यावर आरोप केला आहे की, हे लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलमांचे उल्लंघन आहे.

काय आहे प्रकरण?

हेमंत सोरेन यांनी झारखंडचे मुख्यमंत्री असताना स्वत:ला आणि भावाला खाणपट्टा जारी केल्याचा आरोप आहे. त्यावेळी हेमंत सोरेन यांच्याकडे खाण मंत्रालयही होते. ईडीने अलीकडेच खाण सचिव पूजा सिंघल यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती, पूजा यांनीच खाण परवाना जारी केला होता.

बातम्या आणखी आहेत...