आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचा कहर:आईपासून पाच मुलांना कोरोनाची लागण; फक्त 16 दिवसात आईसह पाचही मुलांचा मृत्यू

धनबाद2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धनबादमध्ये (झारखंड) एका व्यावसायिकाच्या कुटुंबात अवघ्या १६ दिवसांत कारोनामुळे ८८ वर्षीय वृद्ध महिलेसह तिच्या चार मुलांचा मृत्यू झाला. तर, कुटुंबातील इतर पाच जणांवर उपचार सुरू आहेत. एवढ्यावरच हे मृत्युसत्र थांबले नाही तर या महिलेच्या आणखी एका मुलाचा कॅन्सरने मृत्यू झाला. त्यामुळे तिच्या सहापैकी आता एकच मुलगा जिवंत आहे. कोरोना काळातील कदाचित ही सर्वात क्लेशदायक घटना असेल.

जूनच्या शेवटच्या आठवड्यात धनबादमध्ये कतरासमध्ये एका कुटुंबात विवाहाची जय्यत तयारी सुरू होती. २६ जूनला घरातील सर्वात वृद्ध ८८ वर्षीय महिला आपल्या नातवाच्या लग्नासाठी दिल्लीत आली. २७ तारखेला विवाह झाला. दरम्यान, दुसऱ्या दिवशी महिलेची प्रकृती बिघडली. तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, सहा दिवसांनी ४ जुलैला तिचे निधन झाले. तिचा स्वॅब घेऊन रुग्णालयाने मृतदेह नातेवाइकांकडे सोपवला. येथून कुटुंबाच्या आनंदाला ग्रहण लागले. महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मग सर्वांचीच चाचणी झाली. कुटुंबात तिच्या ४ मुलांसह १० जण पॉझिटिव्ह आले. उपचारांदरम्यान हळूहळू सर्वांची प्रकृती बिघडत गेली. १० व ११ जुलैला दोन मुले धनबादमध्ये दगावली. १२ जुलैला तिसऱ्याचे रांचीमध्ये तर सात दिवसांनी १९ जुलैला चौथ्या मुलाचा मृत्यू झाला. या सर्वांचे वय ६० च्या वर होते. कुटुंबातील आणखी सहा जण रांचीमध्ये रुग्णालयात आहेत.

दरम्यान, या महिलेच्या आणखी एका मुलाचे १९ जुलै रोजी रांचीमध्ये निधन झाले. त्याच्यावर कॅन्सरचे उपचार सुरू होते. या दुष्टचक्रात महिलेसह पाच मुले दगावली. आता एकच मुलगा जिवंत आहे. ही वृद्ध महिला दिल्लीत त्याच्याकडेच राहत होती. तो लग्नात उपस्थित नव्हता.

बातम्या आणखी आहेत...