आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Dhanbad Fire Accident; 14 Family Members Killed | Ashirwad Twin Towers | Jharkhand

दिव्य मराठी एक्सक्लूझिव्हइकडे कुटुंबातील 14 जणांचा मृत्यू, तिकडे 7 फेरे:वधू स्वातीला माहितच नव्हते आई-भाऊ, आजी-आजोबा आता या जगात नाहीत

राहुल गुरू | धनबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

झारखंडच्या धनबाद अग्निकांडात आतापर्यंत 14 जणांचा बळी गेला आहे. हे सर्वजण एकाच कुटुंबातील होते. आशीर्वाद ट्विन टॉवरमधील ज्या घरात ही आग लागली, त्यात घरात मुलीचे लग्न होते. घटनास्थळापासून अघ्या 500 मीटर अंतरावरील सिद्धी विनायक मॅरेज हॉलमध्ये स्वाती नामक या मुलीच्या लग्नाचे विधी सुरू होते.

दैनिक दिव्य मराठीची टीम रांचीहून मध्यरात्री 2 वा. धनबादला पोहोचली. आशीर्वाद ट्विन टॉवरचे दृश्य अत्यंत विचलित करणारे होते. तेथे पोहोचल्यानंतर आम्हाला समजले की, याच कुटुंबातील मुलीचे लग्न घटनास्थळापासून 500 मीटर अंतरावरील मॅरेज हॉलमध्ये सुरू असल्याचे समजले. त्यानंतर आम्ही तिथे गेलो. तेथील वातावरण अत्यंत वेगळे होते. मान खाली घालून मुलीचे वडील बसले होते. वधू लग्नाचे विधी पूर्ण करत होती. पाठवणीपर्यंत वधूला आपले कुटुंब आता या जगात नाही हे ठावूक नव्हते.

सर्वप्रथम पाहा लग्नाचे फोटो...

सिंदूरदान विधी करताना वर.
सिंदूरदान विधी करताना वर.
लग्नमंडपात बसलेली वधू स्वाती.
लग्नमंडपात बसलेली वधू स्वाती.
वधू लग्न सुरू असताना आपल्या आई व भावाला शोधत होती.
वधू लग्न सुरू असताना आपल्या आई व भावाला शोधत होती.
वधूच्या कुटुंबाने सांगितले होते की, सर्वजण कामात आहेत, थोड्याच वेळात येतील.
वधूच्या कुटुंबाने सांगितले होते की, सर्वजण कामात आहेत, थोड्याच वेळात येतील.

हे छायाचित्र कॅमेऱ्यातून टिपताना आम्हीही भावूक झालो होतो. मॅरेज हॉलच्या एका कोपऱ्यात सुंदर मंडप सजला होता. त्याच मंडपात स्वाती बसलेली होती. जवळपास 2 तासांत लग्नाचे सर्व विधी पार पडले. विधी पूर्ण होताच तिची नजर आपल्या आईला शोधत होती.

लग्न चांगल्या पद्धतीने पार पडावे यासाठी सर्वजण सर्वकाही माहिती असतानाही काहीच माहिती नसल्याचे सोंग करत होते

मंडपाच्या आसपास बसलेल्या महिला व तिच्या कुटुंबातील सर्वच सदस्य आपसात अशा पद्धतीने चर्चा करत होते की काही घडलेच नाही असे वाटत होते. स्वातीला या दुखद घटनेचा थांगपत्ता लागू नये अशी त्यांची इच्छा होती.

वडिलांनी बोलणे बंद केले

मॅरेज हॉलपासून थोड्याच अंतरावर वधूचे नात्यातील काका सुशांत आम्हाला भेटले. ते प्रथम काहीच बोलण्यास तयार झाले नाही. पण कॅमेऱ्यापुढे न बोलण्याची अट घालून त्यांनी या घटनेची स्वातीला काहीच माहिती नसल्याचे सांगितले.

ते म्हणाले - वडील स्वातीला बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत. स्वातीचे वडील सुबोध श्रीवास्तव मंडपालगतच्या एका खुर्चीत बसले होते. पण इच्छा असूनही त्यांना कन्यादानाचा विधी पूर्ण करता आला नाही. हा विधी स्वातीच्या एका भावाने पूर्ण केला. वडिलांनी डबडबलेल्या डोळ्यांनी हे सर्व पाहिले.

पहाटे 5 वा. स्वातीची पाठवणी झाली. पाठवणीवेळीही तिला आपल्या घरात अशी दुर्घटना घडल्याचे माहिती नव्हते.
पहाटे 5 वा. स्वातीची पाठवणी झाली. पाठवणीवेळीही तिला आपल्या घरात अशी दुर्घटना घडल्याचे माहिती नव्हते.

...आणि स्वातीने ओल्या डोळ्यांनी निरोप घेतला

आता वधूच्या पाठवणीची वेळ आली होती. लग्नमंडपातील वातावरण पाहून आम्हालाही धक्का बसला होता. तेथील वातावरणाचे वर्णन करणे अवघड होते. मध्यरात्र 2.30च्या सुमारास लग्नाचे सर्व विधी पूर्ण झाले. त्यानंतर पाठवणीची घटिका आली. सर्वजण पाठवणी कशी करायीच या विचारात पडले. अनेक बहाणे करून आईच्या उपस्थितीशिवाय विवाह सोहळा पार पडला, पण पाठवणी करणे कठीण जाईल, असा सर्वांचा व्होरा होता. या गोंधळातच रात्र संपली.

पहाटेचे 5 वाजले होते. पाठवणीच्या विधी सुरू झाल्या. यावेळी स्वातीच्या नजरा आपल्या आईला शोधत होत्या. काहीतरी घडल्याची शंका तिच्या मनात आली. पाठवणीवेळीही कुटुंबातील सदस्य उघड बोलणे टाळू लागले. स्वातीला या क्षणीही काही कळू नये अशी त्यांची इच्छा होती. ते आम्हाला हात जोडून एकदा पाठवणी होऊ द्या असे सांगू लागले.

15 ते 20 मिनिटांचा वेळ मिळाला असता तर मृत्यू टळले असते

पाठवणी झाल्यानंतर सर्वजण एकमेकांचे सांत्वन करत होते. सुबोध श्रीवास्तवचे हजारीबागहून आलेले नातेवाईक राजकुमार लाल दाटलेल्या कंठाने सांगतात की, सायंकाळी साडेपाचपर्यंत सर्वकाही सुरुळीत होते. मुले कधी घरात, तर कधी पायऱ्यांवर धावत होते. घरातील महिला काम आटोपून लग्नस्थळी पोहोचण्याच्या प्रयत्नांत होत्या.

त्यातच घरात सर्वत्र काळा धूर पसरल्याचे दिसले. महिला तोपर्यंत मंगल दिप गात होत्या. आता सर्वत्र आरडाओरडा पसरला होता. काय घडले हे लक्षात येईपर्यंत आग संपूर्ण घरात पसरून सर्वांच्या डोळ्यापुढे काळोख पसरला होता.

ते सांगतात की, मी महिलांच्या चेहऱ्यावर भीती पाहिली. अवघ्या 15 ते 20 मिनिटांत आनंदाची जागा दुःखाने घेतली होती. हाच 20 मिनिटांचा वेळ मिळाला असता तर एवढे मृत्यू झाले नव्हते.

पाठवणीनंतर कुटुंब पोहोचले पीएमसीएच

पहाटे साडे 5 ते 6 च्या दरम्यान पाठवणी संपल्यानंतर कुटुंबाचे पाय जवळपास 7 किमी अंतरावरील पीएमसीएचकडे वळले. तिथे ते आपल्या आप्तस्वकियांना शोधत होते. येथे सुबोध श्रीवास्तव यांच्या कुटुंबातील भेटणारे सर्वजण मृतदेहांची ओळख पटवणेही अवघड असल्याचे अश्रू आवरत सांगत होते.

सुबोध श्रीवास्तव यांच्या कुटुंबातील सदस्य शवविच्छेदन लवकरात लवकर पार पाडण्याच्या प्रक्रियेत लागले. पण वृत्त लिहीपर्यंत शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू झाली नव्हती.

स्वातीच्या लग्नाची मोठी बहीण मागील 2 महिन्यांपासून तयारी करत होती. स्वातीच्या बहिणीसह तिचा भाऊही या आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.
स्वातीच्या लग्नाची मोठी बहीण मागील 2 महिन्यांपासून तयारी करत होती. स्वातीच्या बहिणीसह तिचा भाऊही या आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.

दुर्घटनेत वधूच्या बहिणीसह भावाचा मृत्यू

बोकारो प्लांटमध्ये काम करणारे सुबोध यांचे जावई पिंटू सिंह रोजच्या सारखे आपल्या कामावर गेले होते. अचानक सायंकाळी 6.30 वा. त्यांना फोन आला. त्यांनी तो उचला. समोरून त्यांच्या मुलाचा आवाज होता. पापा बिल्डिंगला आग लागली. पिंटू सिंह यांची पत्नी व जवळपास 8 वर्षांचा मुलगा या लग्नासाठी धनबादला आला होता.

वडील पळाले - ते धावत धनबादला पोहोचले. पण तोपर्यंत मुलाचा मृत्यू झाला होता. या अपघातात पिंटू सिंह यांचे सर्वकाही संपले. पिंटू सिंह यांनी या लग्नात सहभागी होण्यासाठी आपली पत्नी व मुलाला पाठवले होते. कामामुळे त्यांचे लग्नाला येणे झाले नाही.

पिंटू सांगतात की, मी सुबोध यांचा नात्यातील जावई आहे. या लग्नासाठी माझी पत्नी अनेक दिवसांपासून उत्साही होती. मला सुट्टी न मिळाल्याने मी पत्नी व मुलाला लग्नाला पाठवले होते.

पिंटू सिंह बोकोराच्या बारीडीहचे आहेत. ते म्हणाले की, या दुर्घटनेची माहिती मिळताच मी आशीर्वाद टॉवरकडे धाव घेतली. तिथे गेल्यानंतर सर्वांना रुग्णालयात दाखल केल्याचे सांगितले. आतापर्यंत मला माझी पत्नी व मुलाला पाहता आले नाही. मी रात्रीपासून त्यांना पाहण्यासाठी धडपड करत आहे. मला आत जाऊ दिले जात नाही. येथील स्थिती फार वाईट आहे.

बातम्या आणखी आहेत...