आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jharkhand Mines Secretary IAS Pooja Singhal Arrested, Cash Seized From Home And Husband's Hospital

झारखंडच्या खाण सचिवांवर ईडीची टाच:खाण घोटाळा प्रकरणी आयएएस पूजा सिंघल यांना अटक, घर आणि पतीच्या हॉस्पिटलमधून मोठी रोकड जप्त

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

झारखंड खाण खात्याच्या सचिव पूजा सिंघल यांना ईडीने अटक केली आहे. भ्रष्टाचार प्रकरणात पूजावर आरोप झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून त्यांची रांची येथील ईडी कार्यालयात चौकशी सुरू होती. बुधवारीही त्यांची 9 तास चौकशी करण्यात आली होती.

यापूर्वी, गेल्या आठवड्यात ईडीने मनरेगा घोटाळ्याच्या संदर्भात पूजा सिंघलचे निवासस्थान आणि त्यांच्या पतीचे पल्स हॉस्पिटल, सीए सुमन कुमार सिंग आणि इतर अनेक ठिकाणी छापे टाकले होते. यावेळी ईडीने मोठ्या रकमेसह अनेक महत्त्वपूर्ण कागदपत्रेही जप्त केली होती.

पूजा सिंघलच्या घरातून एक डायरी सापडल्याचा दावा केला जात आहे. त्यात नोकरशहा, राजकारणी आणि प्रभावशाली लोकांची नावे आहेत. व्यवहारांचाही उल्लेख आहे. या प्रकरणी पूजा सिंघलसह ईडी आणखी अनेकांना चौकशीसाठी बोलावू शकते, असे मानले जात आहे.

21 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात आयएएस, सर्व सीएमच्या जवळच्या
पूजा सिंघल फक्त 21 वर्षे 7 दिवस एवढे वय असताना पहिल्याच प्रयत्नात आयएएस झाल्या होत्या. त्या सर्वच मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या राहिल्या, मग अर्जुन मुंडा असो, रघुवर दास असो की हेमंत सोरेन. कमी वयात आयएएस झाल्याने त्यांचा कार्यकाळ 31 जुलै 2038 पर्यंत आहे. त्या केंद्रात उच्च पदापर्यंत जाऊ शकत होत्या, असे मानले जात आहे. पण वादात राहिल्याने अन् आता ईडीच्या कारवाईनंतर त्या अडचणीत आल्या आहेत. त्यांनी 1999 च्या तुकडीचे आयएएस अधिकारी राहुल पुरवार यांच्याशी विवाह केला. 2004 मध्ये हजारीबागमध्ये राहुल उपायुक्त आणि पूजा एसडीओ होत्या. तेथे पती-पत्नीत वाद झाला. अखेर घटस्फोट झाला. 2010 मध्ये पूजा यांनी डॉ. अभिषेक झा यांच्याशी विवाह केला. अभिषेक यांचे रांचीत आलिशान रुग्णालय आहे. माजी सीएम रघुवर दास यांच्या कार्यकाळात 35 हजार युवकांना नियुक्तिपत्र दिल्याने त्यांचे नाव लिम्का बुकमध्ये नोंदले गेले आहे.

मनरेगा-खाणसह अनेक घोटाळ्यांत नाव जोडले
2013 मध्ये पलामूमध्ये पूजा उपायुक्त असताना खासगी कंपनीला कठौतिया खाण पट्टा वाटप केला. यावरूनही वाद झाला. त्याची अद्यापही चौकशी सुरू आहे. त्या चतरामध्ये मनरेगा योजनेत दोन एनजीओंना 6 कोटी रु. देण्यावरूनही चर्चेत आल्या आहेत. ही रक्कम मुसळी उत्पादनाच्या नावावर दिली होती, मात्र मनरेगामध्ये अशी तरतूद नव्हती. 2009-10 मध्ये पूजा खूंटी जिल्ह्याच्या उपायुक्त झाल्या तेव्हा मनरेगाच्या 18 कोटी रुपयांच्या घोटाळ्याबाबत त्यांच्याविरुद्ध 16 गुन्हे दाखल झाले होते.

बातम्या आणखी आहेत...