आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jharkhand Most Sensitive To Socio economic Threats Of Climate Change, IIT IISC Research Report

हवामान:हवामान बदलाच्या सामाजिक-आर्थिक धोक्यांबाबत झारखंड सर्वात संवेदनशील, आयआयटी-आयआयएससीचा संशोधन अहवाल

नवी दिल्ली / अनिरुद्ध शर्मा9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हवामान बदलामुळे भूकंप, भूस्खलन, पूर, आपत्ती, अतिवृष्टी किंवा तीव्र उन्हाळा यासारख्या तीव्र हवामानाच्या स्थितीचा सामना संपूर्ण जग करत आहे. या घटनांच्या सामाजिक-आर्थिक प्रभावाबद्दल बोलायचे झाल्यास भारतात झारखंड हे सर्वात संवेदनशील राज्य आहे. आयआयटी-मंडी, गुवाहाटी व आयआयएससी- बंगळुरूने पहिल्यांदाच राज्यांचा हवामानातील असुरक्षितता निर्देशांक तयार केला आहे. त्यानुसार सर्वात संवेदनशील राज्यांमध्ये झारखंड, मिझोराम, ओडिशा, छत्तीसगड, आसाम, बिहार, अरुणाचल प्रदेश व पश्चिम बंगालचा समावेश आहे. महाराष्ट्र या यादीत शेवटच्या क्रमांकावर म्हणजे कमीत कमी संवेदनशील आहे. मात्र, देशातील सर्व राज्यांच्या संवेदनशीलतेत जास्त फरक नाही.

टॉप-१०० संवेदनशील जिल्ह्यात ६० टक्के आसाम, बिहार व झारखंडचे आहेत. याआधी २०१८-१९ मध्ये देशातील फक्त १२ हिमालय पर्वतीय राज्यांचा अशा प्रकारचा निर्देशांक तयार करण्यात आला होता.

सर्वाधिक संवेदनशील राज्ये
झारखंड, मिझोराम, ओडिशा, छत्तीसगड, आसाम, बिहार, अरुणाचल प्रदेश, प. बंगाल

मध्यम दर्जाचे संवेदनशील
उत्तर प्रदेश, त्रिपुरा, गुजरात, मेघालय, जम्मू-काश्मीर (पूर्वेकडील राज्य), राजस्थान, मध्य प्रदेश, मणिपूर, आंध्र प्रदेश, कर्नाटक

तुलनेने कमी संवेदनशील
हिमाचल प्रदेश, तेलंगणा, सिक्कीम, पंजाब, उत्तराखंड, हरियाणा, तामिळनाडू, केरळ, नागालँड, गोवा, महाराष्ट्र

बातम्या आणखी आहेत...