आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jharkhand Dalit Rubika Pahadin Murder; Choped Wife Body Into Pieces | Jharkhand News

झारखंडच्या दिलदारने प्रेयसीचे केले 50 तुकडे:कुत्रे खात होते मांस, शीर अद्याप सापडले नाही; तपास सुरु

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

झारखंडमध्ये दिल्लीच्या श्रद्धा हत्याकांडापेक्षाही निर्घृण हत्या घडली आहे. आफताबने श्रद्धाचे 35 तुकडे केले, पण साहेबगंजमध्ये दिलदार अन्सारीने त्याची मैत्रीण रिबिका पहाडीनचे 50 पेक्षा जास्त तुकडे केले. हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे करून पोत्यात भरून घरात ठेवले होते. त्याने रिबिकाचे काही तुकडे परिसरातील निर्जन ठिकाणी फेकले होते. कुत्रे त्याचे मांस ओरबाडून खात होते.

कुत्र्यांना मानवी मांस खाताना लोकांनी पाहिले तेव्हा त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. मुलीचे शीर अद्याप सापडलेले नाही. मृत तरुणी आदिम पहारिया आदिवासी समाजाची होती. ही घटना शनिवारी संध्याकाळची असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना बोरिओ ब्लॉकची असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याने सांगितलेल्या ठिकाणांवरून मृतदेहांचे तुकडे गोळा करणे सुरु आहे.

कुत्रे मृतदेह खात होते
संताळी पंचायतीच्या मोमीन टोला येथे ग्रामस्थांना अंगणवाडी केंद्राजवळ मानवी शरीराचे काही तुकडे दिसले. कुत्रे पाय, छाती आणि शरीराच्या इतर भागांना ओरबाडून खात असल्याचे लोकांनी पाहिले.

हा मानवी मृतदेह असल्याचा संशय लोकांना आल्याने त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच बोरीओ पोलीस ठाण्याचे प्रभारी जगन्नाथ पान आणि एएसआय करुण कुमार पथकासह पोहोचले.

पोत्यात 50 तुकड्यांमध्ये मृतदेह आढळला
पोलिसांनी मृतदेहाचे काही तुकडे ताब्यात घेऊन या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी महिलेचा प्रियकर दिलदार अन्सारी याला बेला टोला येथून अटक केली आहे.

त्याच्या सांगण्यावरून, पोलिसांनी अंगणवाडी केंद्रापासून सुमारे 300 मीटर अंतरावर असलेल्या मंझटोला येथील एका बंद घरातून मृतदेहाचे आणखी अनेक तुकडे जप्त केले. काही तुकडे जमिनीवर विखुरलेले होते, तर काही तुकडे पोत्यामध्ये भरून ठेवले होते.

दोघे लिव्ह-इनमध्ये राहत होते
ही हत्या कोणत्या कारणासाठी करण्यात आली, याबाबत पोलिसांनी स्पष्टपणे काहीही सांगितलेले नाही. प्राथमिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, तरुण आणि तरुणी एकत्र राहत होते, मात्र दोघांमध्ये भांडणे होत होती, अलीकडे दोघांमध्ये वाद वाढला होता. त्यानंतर आरोपीने ही हत्या केली.

बातम्या आणखी आहेत...