आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jharkhand One Sided Love Story; Man Burnt Alive His Girlfriend, Latest News And Update 

दुमकात पुन्हा एका तरूणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न:घरात झोपलेल्या तरुणीवर पेट्रोल टाकून पेटविले; एकतर्फी प्रेमातून आरोपीचे कृत्य

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

झारखंड राज्यातील दुमका येथे पुन्हा एका तरूणीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आरोपीने एकतर्फी प्रेमातून हा प्रकार केला असल्याचे सांगितले जात आहे.

आरोपी राजेश राऊतचे लग्न झालेले आहे. तरी देखील तो पीडितेच्या मागे लग्नासाठी मागे लागला होता. तरूणीने त्याला अनेकदा नकार दिला होता. त्यानंतरही तो तिच्या मागेच लागला होता. तर तुला जिवे मारून टाकीन अशी धमकीही दिली होती.

हे प्रकरण जारमुंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भालकी भरतपूर गावातले आहे. गुरूवारी रात्री आरोपी राजेशने तरुणीच्या घरात घुसून तिच्यावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. 19 वर्षीय मारुती कुमारी गंभीररित्या भाजली. प्राथमिक उपचारानंतर तिला रांची येथील रिम्स रुग्णालयात पाठविण्यात आले. जवळपास 90 टक्के भाजल्यामुळे मारुती कुमारीची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दुसरीकडे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

तरुणी म्हणाली - राजेश बळजबरीने लग्नासाठी दबाव टाकत होता

  • पोलिस अधिकाऱ्यांना जबाबात तरुणी म्हणाली की, गुरुवारी रात्री राजेश याने दरवाजाचे लॉक तोडून घरात प्रवेश केला अन् पेट्रोल टाकून पेटवून दिले. आग लागताच ती उठली तेव्हा तिला राजेश घराबाहेर पळताना दिसला. मारुती कुमारी ही जामा पोलीस स्टेशन हद्दीतील भैरवपूर गावातील आहे. लहानपणापासून ती आजीसोबत राहते. तर आरोपी राजेश हा रामगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महेशपूर गावातील आहे.
  • मारुती कुमारीने जबाबात म्हटले की, आरोपी तिच्यावर लग्नासाठी बळजबरीने दबाव टाकत होता. मुळात त्याचे याच वर्षी लग्न झालेले आहे. त्यानंतरही त्याला माझ्याशी लग्न करायचे होते. तीन चार दिवसांपूर्वी मी त्याला लग्न करण्यास नकार दिला होता. तेव्हा राजेशने मला जिवे मारण्याची धमकी दिली होती.
गंभीर जखमी झालेली तरूणी मारुती कुमारी.
गंभीर जखमी झालेली तरूणी मारुती कुमारी.

कुटुंबाला उपचारासाठी एक लाख रुपये दिले

घटनेची माहिती मिळताच एसडीपीओ, डीएसपी, पोलीस स्टेशन प्रभारी फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले होते. पीडितेचा जबाब नोंदवला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने पीडितेला तात्काळ रांची येथील रिम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यासोबतच कुटुंबाला एक लाख रुपयांची मदतही देण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी सांगितले की, मारुती कुमारी आरोपी राजेशला 2021 पासून ओळखते.

या घटनेत पीडिता मारुती कुमारी गंभीररीत्या भाजली आहे.
या घटनेत पीडिता मारुती कुमारी गंभीररीत्या भाजली आहे.

लोकांना दुमका हत्याकांडाची आठवण झाली
दीड महिन्यात दुमका भागात घडलेली ही दुसरी घटना आहे. 23 ऑगस्ट रोजी शाहरुखने मित्रासह 16 वर्षांच्या अंकिताला जाळले होते. ती घरात झोपली असताना शाहरुखने तिला जाळले. उपचारादरम्यान अंकिताचा मृत्यू झाला होता.

या संबंधित पूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अंकिताचा मारेकरी नईमवर खुलासा:पीडित मुलगी म्हणाली- मलाही दुबईत विकण्याच्या प्रयत्नात होता; काही दिवसांनीच केली अंकिताची हत्या
अंकिताचा मारेकरी नईमवर खुलासा:पीडित मुलगी म्हणाली- मलाही दुबईत विकण्याच्या प्रयत्नात होता; काही दिवसांनीच केली अंकिताची हत्या
बातम्या आणखी आहेत...