आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराझारखंडच्या चतरात सोमवारी झालेल्या एका चकमकीत सुरक्षा दलांनी 5 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. यापैकी 2 नक्षल्यांवर प्रत्येकी 25 लाख रुपयांचे बक्षीस होते. घटनास्थळावरून 2 AK47 जप्त करण्यात आल्यात. या भागात सुरक्षा दलांनी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे.
ही चकमक लातेहार, पलामू व चतरा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील लाव्हालौंगच्या रीमी गावालगत घडली. त्यात 25 लाखांचे बक्षीस असणाऱ्या गौतम पासवान व चार्ली नामक नक्षलवादी मारले गेले. गौतम पासवान लातेहार, पलामू व चतरा जिल्ह्यात सक्रीय होता. उर्वरित मृत नक्षल्यांत सब झोनल कमांडर नंदू, अमर गंझू व संजी व भुइंया यांचा समावेश आहे.
कोब्रा 203 टीमसोबत चकमक
सोमवारी सकाळी 9 च्या सुमारास कोब्रा 203 टीम व नक्षलवाद्यांत चकमक सुरू झाली. ठार झालेल्या नक्षलवाद्यांपैकी 2 सॅक मेम्बर व 3 सब झोनल कमांडर आहेत. सब झोनल कमांडरांवर प्रत्येकी 5 लाख रुपयांचे बक्षीस होते.
पलामू-चतराच्या सीमेवर ऑपरेशन सुरू
एसपी राकेश रंजन यांच्या निर्देशांनुसार, सुरक्षा दलांनी पलामू-चतरा सीमेवर माओवाद्यांविरोधात कारवाई सुरू केली होती. ही कारवाई सीआरपीएफ कोब्रा बटालियन, जेएपी, आयआरबी तसेच पलामू व चतरा जिल्हा दलाने संयुक्तपणे केली. चकमकीच्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात नक्षलवादी साहित्य जप्त करण्यात आल्याचेही समोर आले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.