आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jharkhand Rape And Murder Case | When She Got Pregnant After Rape, She Was Killed, So She Was Hanged From A Tree.

अल्पवयीन आदिवासी मुलीवर बलात्कार:गरोदर राहिल्यानंतर खून; आत्महत्या वाटावी म्हणून मृतदेह लटकवला झाडाला

रांचीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

झारखंडच्या दुमकामध्ये एका अल्पवयीन मुलीचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेतील आरोपी अनेक दिवसांपासून तिच्यावर बलात्कार करत होता. जेव्हा ती गर्भवती झाली तेव्हा आरोपीने तिचा गळा आवळून खून केला. इकतच नाही तर ही घटना आत्महत्या वाटावे म्हणून आरोपीने मुलीच्या मृतदेहाला एका झाडावर लटकवले. सदरील घटनेतील पीडित ही आदिवासी समाजातील आहे. तर आरोपीचे नाव अरमान अंसारी असे आहे. अल्पवयीन मुलीचा बलात्कार आणि हत्या यावरून भाजपने राज्य सरकारला धारेवर धरले आहे. यापूर्वी दुमका येथे 23 ऑगस्ट रोजी एका बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर पेट्रोल शिंपडून जाळून मारण्यात आले होते.

काल घडलेली घटना ही दुमका जिल्ह्यातील युनिवर्सिटी ओपी क्षेत्रातील श्रीअमडा गावातील आहे. पोस्टमार्टम नंतर मुलीचा खून करण्यात आल्याचे समोर आले. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी अरमानला अटक केली आहे. तो व्यवसायाने गवंडी आहे. पोलिस त्याची विचारपूस करत असून, त्याला सोमवारी कोर्टात दाखल केले जाणार आहे. दोन धर्मात तेढ निर्माण होऊ नये म्हणून पोलिस याविषयी अधिकची माहिती देत नाहीये.

पोस्टमार्टममध्ये धक्कादायक खुलासा

अल्पवयीन मुलीचे पोस्टमार्टम करण्यात आले असून, त्यामध्ये मुलगी गर्भवती असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. सदरील अल्पवयीन मुलगी 14 वर्षांची आहे. ती मजूरी काम करते. कामावर असतानाच अरमान तिला घेरले आणि गेल्या अनेक दिवसांपासून तो तिच्यावर अत्याचार करायचा. मात्र, जेव्हा ती गर्भवती असल्यानंतर आरोपीने तिचा खून करण्यात आला.

पोलिस स्टेशनमध्ये पीडितेचे कुटुंबीय
पोलिस स्टेशनमध्ये पीडितेचे कुटुंबीय

कामासाठी दुमका येथे यायची

मुलीचा मृतदेह तिच्या घरापासून लांब अंतरावर एका शहरी भागात सापडले. पोलिसांना मुलीचा मृतदेह एका झाडाला अटकलेल्या अवस्थेत आढळले. त्यानंतर पोलिसांनी तपास केल्यानंतर सदरील मुलगी दुमका जिल्ह्यातील रानीश्वर भागात राहते. तिचा मृतदेह घरापासून 50 किलोमीटर अंतरावर सापडला. तिच्या कुटुंबियांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. अल्पवयीन मुलगी ही मजूरी काम करण्यासाठी तिच्या गावातून दुमका शहरात यायची. कधी-कधी ती जामा थाना येथे आपल्या मावशीकडे देखील राहायची.

दुमकाचे डीआयजी सुदर्शन प्रसाद मंडल यांनी सांगितले की, आरोपींवर आयपीसीची कलम 376, 302 आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या त्याची चौकशी सुरू आहे, मात्र त्याने ही हत्या का केली? याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

कारवाईची मागणी

घटनेची माहिती मिळताच भाजप नेते आणि माजी मंत्री लुईस मरांडी यांनी युनिव्हर्सिटीने ओपी पोलिस ठाणे गाठून पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ते म्हणाले की, दुमका येथील मुलींसोबत अशा घटना सातत्याने घडत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी.

सोरेन सरकारला घेरले

खासदार निशिकांत दुबे आणि माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांनी या प्रकरणावर हेमंत सोरेन सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. खासदाराने मरांडीचे ट्विट रिट्विट करून अंकिताचा खून शाहरुखने केला आणि आज त्याच दुमका येथील आदिवासी मुलीवर बलात्कार केल्यानंतर अरमान अन्सारीने आदिवासी मुलीचा खून केला, ही बातमी लपवण्यासाठी आमच्या मुलांवर आणि मनोज तिवारीवर गुन्हा दाखल करण्यात आला. झारखंडमध्ये इस्लामीकरण आणि त्याचे परिणाम, लढा सुरूच आहे. असे ट्विट दुबे यांनी केले आहे.

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनीही या प्रकरणी एक ट्विट केले असून त्यांनी लिहिले आहे की, दुमका येथील घटनेने मी दु:खी आहे. या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली असून न्याय सुनिश्चित करण्यासाठी मी दुमका पोलिसांना कठोर कायदेशीर पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. देव दिवंगत मुलीला शांती देवो आणि शोकाकुल कुटुंबाला ही कठीण वेळ सहन करण्याची शक्ती देवो.

बातम्या आणखी आहेत...