आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपले सौरमंडळ, पृथ्वी किंवा अन्य ग्रह कसे तयार झाले, या प्रश्नांची उकल करण्यासाठी मी आणि माझ्या टीममधील सात सहकाऱ्यांनी - त्यात चौघे भारतीय होते - सात वर्षे झारखंडच्या कोल्हान आणि ओडिशाच्या क्योंझर व अन्य जिल्ह्यांतील पर्वतरांगा पिंजून काढल्या. पृथ्वीतून जमीन कधी बाहेर निघाली या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी जिद्द आवश्यक होती. हा नक्षलग्रस्त भाग होता, मात्र आम्ही हे काम करायचेच, असा निश्चय केला होता. आपल्या ६-७ वर्षांच्या फील्ड वर्कमध्ये जवळपास ३००-४०० किलो दगडांचा प्रयोगशाळेत अभ्यास केला. या दगडांमध्ये वालुकामय दगड होते आणि काही ग्रॅनाइट. वालुकामय दगडाचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यांची निर्मिती नदी किंवा सागरी किनाऱ्यावर झाली होती. वालुकामय दगड ३२० कोटी वर्षांआधी तयार झाल्याचे लक्षात आले. याचा अर्थ आजपासून ३२० कोटी वर्षांआधी हा प्रांत एक भूखंडाच्या रूपात समुद्राच्या पृष्ठभागाच्या वर हाेता. आतापर्यंत आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाचे क्षेत्र सर्वात आधी समुद्रातून बाहेर निघाल्याचे मानले जात होते. मात्र, सिंहभूम क्षेत्र त्यांच्यापेक्षाही २० कोटी वर्षे आधी तयार झाले.
३२० कोटी वर्षांपूर्वी पाण्यावर निघाले सिंहभूम
आमच्या दाव्यानुसार, सिंहभूम क्रेटान समुद्रातून निघालेले पहिले बेट आहे. हा संपूर्ण टीमसाठी रोमांचक क्षण होता. आम्ही ग्रॅनाइट दगडाची तपासणी केली तेव्हा कळले की, हे बेट सुमारे ३५० ते ३२० कोटी वर्षांपूर्वी सततच्या ज्वालामुखीच्या हालचालीतून तयार झाले होते. याचा अर्थ असा झाला की ३२० कोटी वर्षांपूर्वी सिंहभूम बेट समुद्राच्या पृष्ठभागावरून वर आले. हे क्षेत्र उत्तरेत जमशेदपूरपासून दक्षिणेत महागिरीपर्यंत, पूर्वेत ओडिशाच्या सिमलीपालपासून पश्चिमेत वीर टोलापर्यंत विस्तारले आहे. या क्षेत्राला आम्ही सिंहभूम क्रेटान वा बेट संबोधतो.
दगड ऑस्ट्रेलियातील लॅबपर्यंत पाठवत होते
आमची टीम वेगवेगळ्या वेळी संशोधनासाठी भारतात पोहोचली. यादरम्यान तीन ते चार क्विंटल दगड संशोधनासाठी एकत्र केले. ते बारीपाडा आणि कोलकातामार्गे ऑस्ट्रेलियात कुरिअरने पाठवले. आम्ही स्थानिक हॉटेल किंवा ढाब्यात जेवण करत होतो आणि संशोधनासाठी वनात व डोंगरांवर जात होतो. नक्षलग्रस्त भाग असतानाही अडचण आली नाही.
रिसर्च टीम {प्रियदर्शिनी चौधरी { जेकब मल्डर {पीटर केवुड {शुभोजित राय {अोलिवर नोबेल(मोनाश युनिव्हर्सिटी, आॅस्ट्रेलिया) {ऐशली वेनराइट(मेलबर्न युनिव्हर्सिटी) {सूर्यजेंदू भट्टाचार्य(कॅलिफोर्निया इन्स्टि.ऑफ टेक्नो) {शुभम मुखर्जी(डीयू, भारत)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.