आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jio ; Company Apologizes To Customers, Jio Will Give 2 Days Free Unlimited Plan To Customers

जियोचे ग्राहक झाले त्रस्त:कंपनीने ग्राहकांची मागितली माफी, ग्राहकांना 2 दिवसांचा फ्री अनलिमिटेड प्लान देणार जियो

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवारी मुंबई सर्कलमध्ये रिलायन्स जिओची सर्व्हिस डाउन झाली होती. त्यामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील जिओची मोबाईल आणि इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. इतकेच नाही तर जियोफाइबर सर्व्हिसमध्ये प्रॉब्लम असल्याच्या चर्चा देशभरातून समोर आल्या होत्या. मात्र, रात्री 8 नंतर दूरसंचार सेवा पूर्ववत झाली. ग्राहकांना झालेल्या गैरसोयीबद्दल कंपनीने माफी मागितली आहे. एवढेच नाही तर कंपनीने अतिरिक्त दोन दिवसांचा 'अनलिमिटेड प्लॅन'ही जाहीर केला आहे.

रिलायन्स जिओने ग्राहकांची माफी मागितली
कंपनीने रात्री उशिरा आपल्या ग्राहकांना पाठवलेल्या संदेशात यूजर्सला येणाऱ्या समस्यांची कबुली दिली आणि या समस्येमुळे अतिरिक्त दोन दिवसांचा 'अनलिमिटेड प्लॅन'ही जाहीर केला. म्हणजेच प्लान संपताच कंपनी दोन दिवस वाढवून देणार आहे.

मेसेजमध्ये असे लिहिले आहे की, 'आमच्या टीमने काही तासांत ही नेटवर्कची समस्या सोडवली असली तरी, आम्ही समजतो की हा तुमच्यासाठी चांगला अनुभव नव्हता आणि आम्ही त्याबद्दल मनापासून दिलगीर व्यक्त करतो.'

देशभरात जियोचे 44.32 कोटी यूजर्स
ट्रायनुसार जुलै 2021 मध्ये जियोच्या एकूण मोबाइल यूजर्सची संख्या 44.32 कोटी, एअरटेलच्या ग्राहकांची संख्या 35.40 कोटी आणि वोडाफोन-आयडियाच्या ग्राहकांची संख्या 27.19 कोटी आहे.

बातम्या आणखी आहेत...