आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचे विधान:म्हणाले, सरकारने जसे जम्मू काश्मिरातून कलम 370 हटवले, तसे एक दिवस POK ही ताब्यात घेणार

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सोमवारी पुन्हा एकदा पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याचा पुनरुच्चार केला आहे. 'भाजप पीओके ताब्यात घेण्याच्या आपल्या आश्वासनावर ठाम आहे. हे सरकार एक दिवस निश्चितच पाकव्याप्त काश्मीर भारतात आणून दाखवेल', असे ते म्हणालेत. सिंह यांनी काश्मीर खोऱ्यातच हे विधान केल्याने पाकच्या पोटात गोळा उठला आहे.

ते म्हणाले, जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा आजवर कुणी विचारही केला नव्हता. पण, या सरकारने हे करवून दाखवले. तसेच हे सरकार पाकच्या ताब्यातील POJK ला भारतात आणून दाखवेल. पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी जम्मूच्या दौऱ्यावर असताना हे विधान केले. ते येथे कठुआ जिल्ह्यातील महाराज गुलाब सिंह यांच्या 20 फुटी उंच पुतळ्याच्या उद्घाटनासाठी आले होते.

POK मुक्त करणे सरकारचे कर्तव्य

जितेंद्र सिंह म्हणाले, सरकारने 1994 मध्ये एक प्रस्ताव पारित केला होता. त्यात पाकच्या ताब्यातील काश्मीर मुक्त करण्यावर भर देण्यात आला होता. पाकने जम्मू काश्मीरचा बळकावलेला भूभाग तत्काळ सोडला पाहिजे. POJK पाकच्या तावडीतून मुक्त करणे हे आमचे कर्तव्य आहे, असे या प्रस्तावात नमूद करण्यात आले होते.

मोदी सरकारने कुणी विचारही केला नसेल असे करवून दाखवले

भाजपने कलम 370 रद्द करण्याचे आश्वासन दिले, तेव्हा कुणीही त्याला गांभिर्याने घेतले नाही. पण, भाजपने आपली आश्वासनपूर्ती करत ते रद्दबातल केले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी 1980 मध्ये भाजपला येथे स्पष्ट बहुमत मिळण्याविषयी विधान केले होते. याचाही तेव्हा कुणी विचार केला नव्हता, असे सिंह म्हणाले.

यापूर्वीही नेत्यांनी POK ताब्यात घेण्याची केली विधाने

भाजप नेत्याने पीओके ताब्यात घेण्याचे केलेले हे विधान पहिलेच नाही. गत महिन्यातच सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल के जे एस ढिल्लन यांनी योग्यवेळी पीओके ताब्यात घेण्यासंबंधीचे विधान केले होते. तत्पूर्वी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही असे विधान केले होते. मोदी सरकार जम्मू काश्मीरचा एवढा विकास करेल की, पीओकेचे लोकच भारतात येण्याची मागणी करतील, असे ते म्हणाले होते.

बातम्या आणखी आहेत...