आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jitin Prasada BJP Party Joining Update; Kapil Sibal | Kapil Sibal Reaction As On Jitin Prasada Quit Congress

सिब्बल यांचे एका बाणात दोन निशाणे:जितिन प्रसादांच्या भाजप प्रवेशावर म्हणाले - माझ्यासोबत हे मेल्यानंतरच शक्य; नेतृत्त्वाला मॅसेज - आता आमचे ऐकण्याची वेळ आहे

नवी दिल्ली11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सिब्बल म्हणाले - काँग्रेसमध्ये सुधारणांची प्रचंड आवश्यकता

जितिन प्रसाद यांनी कॉंग्रेस सोडल्यानंतर आणि भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या दुसर्‍याच दिवसानंतर पुन्हा एकदा कॉंग्रेसमधील अंतर्गत मतभेदांबद्दल चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, पक्षाचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी जितिन प्रसादासारखे म्हणजेच भाजपमध्ये जाण्याचे पाऊल उचलण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. सिब्बल यांनी तर असेही म्हटले आहे की हे त्याच्या मृत्यूनंतरच होऊ शकते. सिब्बल यांनी म्हटले आहे की, जर कॉंग्रेसचे नेतृत्व त्यांना पक्ष सोडून जाण्यास सांगत असेल तर ते त्याबद्दल विचार करू शकतात, परंतु ते कधीही भाजपमध्ये जाणार नाहीत.

मात्र, सिब्बल यांनी जितिन यांच्या निर्णयाचे वर्णन 'प्रसाद राम राजकारण' असे केले आहे. ते म्हणतात की हा निर्णय विचारसरणीमुळे नव्हे तर वैयक्तिक फायद्यासाठी घेण्यात आला आहे. पण सिब्बल यांनी एका बाणाने दोन लक्ष्य साधत असताना पुन्हा एकदा पार्टीच्या नेतृत्त्वाला हा संदेश दिला आहे की आता त्यांचे ऐकायची वेळ आहे.

सिब्बल यांच्या कमेंटला यामुळे महत्त्व आहे कारण, सिब्बल काँग्रेसच्या त्या 23 सीनियर लीडर्समध्ये सामिल आहेत, ज्यांनी गेल्या वर्षी सोनिया गांधींना पत्र लिहून पक्षामध्ये मोठे बदल करण्याची मागणी केली होती. या नेत्यांमध्ये जितिन प्रसाद यांचाही समावेश होता. अशा वेळी प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने अनेक अंदाज व्यक्त केले जात आहेत. काँग्रेसचे असंतुष्ट ट G-23 मधून अजून कुणी भाजपमध्ये प्रवेश करेल का असा अंदाच व्यक्त केला जात आहे.

सिब्बल म्हणाले - काँग्रेसमध्ये सुधारणांची प्रचंड आवश्यकता
सिब्बल म्हणाले आहे की, काँग्रेसमध्ये सुधारणांची प्रचंड आवश्यकत आहे आणि पक्षाच्या लीडरशीपला आता ऐकावे लागेल. जितिन प्रसाद सारखी व्यक्ती भाजपमध्ये प्रवेश करेल हे समजण्याच्या बाहेर आहे. जर मुद्द्यांचे समाधान होऊनही कुणाला वाटत असेल की, काहीच मिळत नसेल तर तो निघून जाईल. जितिन यांच्या जवळही पक्ष सोडण्याची कारणे असू शकतात. यासाठी मी त्यांना चुकीचे नाही ठरवू शकत पण ते ज्या कारणासाठी भाजपमध्ये गेले आहे त्याला मी दोष देत आहे.

सिब्बल म्हणाले की, मला विश्वास आहे की, लीडरशीपला समस्यांविषयी माहिती आहे आणि आशा आहे की ते ऐकतील. कारण न ऐकता काहीच चालू शकत नाही. कोणतेही कॉरपोरेट स्ट्रक्चर न ऐकल्याचे सर्वाइव्ह करु शकत नाही. राजकारणातही असे नाही. जर तुम्ही ऐकले नाही तर तुमचे वाईट दिवस सुरू होतील.

बातम्या आणखी आहेत...