आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • JK Srinagar Hyderpora Terrorists Encounter; Kashmiri Man Reacts On His Son Encounter

वडिलांनी पोलिसांच्या एन्काउंटरवर उपस्थित केले प्रश्न:श्रीनगरमध्ये मारल्या गेलेल्या आमिरचे वडील म्हणाले- मुलगा मजूर होता, त्याच्यावर दहशतवाद्याचे लेबल लावून मारण्यात आले

श्रीनगर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगरच्या हैदरपोरा येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या चकमकीत ठार झालेल्या तरुणाच्या वडिलांनी सुरक्षा दलाच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांचा मुलगा दहशतवादी नसून निर्दोष असल्याचा दावा ते करत आहेत. तो एका दुकानात मजूरी करायचा. 15 नोव्हेंबर रोजी झालेल्या या चकमकीत एकूण 2 दहशतवादी आणि त्यांचे 2 मदतनीस मारले गेले होते.

2005 मध्ये घर सोडून जावे लागले
मारले गेलेले दहशतवादी अमीरचे वडील अब्दुल लतीफ मगरे यांनी सांगितले की, 2005 मध्ये माझ्या भावाची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. यानंतर मी स्वतः एका दहशतवाद्याला दगडाने ठेचून मारले आणि त्याला माझ्या हातांनी ठार केले. मला लष्कराकडून प्रशस्तीपत्रही देण्यात आले. 11 वर्षे आम्हाला आमची घरे सोडून घरोघरी भटकावे लागले.

अब्दुल लतीफचा दावा आहे की, 2005 मध्ये त्यांनी एका दहशतवाद्याला दगडाने ठेचून मारले, तेव्हा लष्कराने त्यांना हे सन्मानपत्र दिले.
अब्दुल लतीफचा दावा आहे की, 2005 मध्ये त्यांनी एका दहशतवाद्याला दगडाने ठेचून मारले, तेव्हा लष्कराने त्यांना हे सन्मानपत्र दिले.

दहशतवादाविरुद्धच्या लढ्याला बक्षीस मिळाले
अब्दुल लतीफ पुढे म्हणाले की, मी माझ्या मुलांचे पालनपोषण केले, पण या सगळ्याचा अर्थ काय होता. माझ्या मुलाला दहशतीचे लेबल लावून मारण्यात आले. मुलाचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठीही दिला नाही. दहशतवादाविरुद्धच्या माझ्या लढ्याचा हा पुरस्कार होता. आजही पोलिस माझ्या घरावर पहारा देत आहेत. उद्या सुरक्षा दल मलाही मारून दहशतवादी घोषित करू शकतात.

पोलिसांनी सांगितले - अमीर हा हाइब्रिड दहशतवादी होता
काश्मीर पोलिसांचे म्हणणे आहे की, अमीर लतीफ मगरे हा हाइब्रिड दहशतवादी होता. अशी दहशतवादी कृत्ये केल्यानंतर ते दैनंदिन कामात मग्न असतात. त्यांची ओळख पटवणे पोलिसांना खूप अवघड जाते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बनिहालचा रहिवासी असलेला अमीर हा दहशतवाद्यांचा स्थानिक सहकारी होता.

काश्मीर पोलिसांचा दावा आहे की, अमीर आपले काम शांतपणे करायचा आणि नंतर त्याची रोजची कामे करत असे.
काश्मीर पोलिसांचा दावा आहे की, अमीर आपले काम शांतपणे करायचा आणि नंतर त्याची रोजची कामे करत असे.

एन्काउंटरमध्ये मारले गेले 4 काश्मिरी
15 नोव्हेंबर रोजी श्रीनगरमधील हैदरपोरा येथे झालेल्या चकमकीत दोन स्थानिक व्यावसायिकांसह 4 काश्मिरी मारले गेले. या कारवाईत मारले गेलेले डॉ. मुदासीर गुल आणि अल्ताफ भट्ट यांची एका व्यापारी संकुलात दुकाने होती. दंत शल्यचिकित्सक मुदस्सीर गुल हे या संकुलात संगणक केंद्र चालवत असत. अल्ताफ हा या व्यापारी संकुलाचा मालक असून तो तेथे हार्डवेअर आणि सिमेंटचे दुकान चालवत होता. अल्ताफ अहमद भट्ट हे दहशतवाद्यांना मदत करायचे, तर डॉ. मुदासीर गुल हे दहशतवाद्यांचे ओव्हर ग्राउंड वर्कर होते, ज्याने त्यांना राहण्यासाठी जागा दिली. ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एक पाकिस्तानी नागरिक हैदर असल्याचा दावा काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी केला होता.

कुटुंबीयांचा आरोप - सुरक्षा दलांनी सर्वसामान्यांची हत्या केली
क्रॉस फायरिंगमध्ये दोघेही मारले गेल्याचे आयजीपी विजय कुमार यांनी सांगितले होते. मात्र, डॉक्टर मुदासीर गुल हे दहशतवाद्यांसाठी कॉल सेंटर चालवायचे, असेही पोलिसांचे म्हणणे आहे. या कॉल सेंटरचा वापर दहशतवादी कारवाया करण्यासाठी केला जात होता. कुमार म्हणाले की, कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीमुळे आम्ही मृतदेह कुटुंबीयांना सोपवू शकलो नाही म्हणून आम्ही मुदासीर आणि अल्ताफ यांच्या कुटुंबीयांकडे अंत्यसंस्कारासाठी संपर्क साधला होता. आम्ही मृतदेह हंदवाडा येथे नेले जेथे त्यांचे दफन करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...