आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्रीनगरच्या नौगाम परिसरात बुधवारी दहशतवादी आणि सुरक्षादलांमध्ये झालेल्या चकमकीत 3 दहशतवादी मारले गेले. जम्मु-काश्मीर पोलिसांनुसार ठार झालेले तिन्हीही दहशतवादी हे लष्कर-ए-तोयबाशी संबंधीत होते. त्यांच्याजवळ अनेक धोकादायक विस्फोटक, हत्यार आणि आपत्तिजनक साहित्य होते, ते जप्त करण्यात आले आहे. सर्च ऑपरेशन अद्याप सुरु आहे.
सर्च ऑपरेशनदरम्यान झाली चकमक
जम्मू काश्मीर पोलिसांनी ट्विट करत या प्रकरणाची माहिती दिली आहे. जोन पोलिसांचे IG विजय कुमार यांनी सांगितले की, खानमोहचे सरपंच समीर भट्ट यांच्या हत्येत सामिल दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचे 3 दहशतवादी मारले गेले आहेत. पोलिसांनुसार, ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये 23 वर्षांचा शाकिब मुश्ताक खान हा श्रीनगरच्या खानमोह येथे राहणारा होता. तर इतर दोन दहशतवादी आदिल नबी तेली (23 वर्षे) आणि उमेर नबी तेली (25 वर्षे) पंपोर येथील राहणार आहेत.
यापूर्वी नौगाम परिसरात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची सूचना मिळाल्यानंतर सुरक्षादलांनी सर्च ऑपरेशन सुरु केले होते. या दरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांवर गोळबार केला. ज्यानंतर सुरक्षादलाने संपूर्ण परिसराला विळखा घातला आणि चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
सरपंचांच्या हत्येनंतरपासून सुरु आहे ऑपरेशन
काश्मीरात 2 सरपंचांच्या हत्येनंतर सुरक्षादलाने पुलवामा, गांदरबलसह अनेक भागांमध्ये दहशतवाद्यांविरोधात अभियान सुरु केले होते. ज्यानंतर पासून सलग दहशतवाद्यांचे एनकाउंटर सुरु आहे. IG विजय कुमार म्हणाले की, पुलवामा चकमकीत जैशचा एक कमांडर देखील मारला गेला होता. जो 2018 पासून पुलवामा-शोपियां परिसरात अॅक्टिव्ह होता आणि अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सामिल होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.