आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात टिळा लावून आणि हिजाब घालून शाळेत आल्याने दोन मुलींना एका शिक्षकाने बेदम मारहाण केली. इयत्ता चौथीत शिकणाऱ्या या मुली जेव्हा द्रामण गावातील सरकारी माध्यमिक शाळेत पोहोचल्या तेव्हा त्यांना निसार अहमद नावाच्या शिक्षकाने बेदम मारहाण केली. ही घटना उघडकीस येताच निसारला निलंबित करण्यात आले आहे. पोलिसांनी निसारला अटक केली आहे, मात्र पोलिसांनी अद्याप या प्रकरणी जातीय सलोखा बिघडवल्याचा गुन्हा दाखल केलेला नाही.
पीडितांनी व्हिडिओमध्ये सांगितली आपबीती
राजौरी येथील पीडित कुटुंबाचा एक व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये निसार अहमदवर मुलींना मारहाण केल्याचा आरोप आहे. व्हिडिओमध्ये वडील अंग्रेज सिंह म्हणत आहेत - ज्या प्रकारे माझ्या मुलीला आणि शकूरच्या मुलीला मारहाण करण्यात आली आहे, उद्या कुणी दुसरा एखादा शिक्षक टिळा आणि हिजाबवरून मुलांना मारहाण करू शकतो. याची चौकशी करावी, असे आवाहन मी सरकारला करतो. मला न्याय हवा आहे जातीय सलोखा बिघडवण्याचा हा डाव आहे. आम्ही या जागेला यूपी, बिहार किंवा कर्नाटक होऊ देणार नाही.
कोटरांकाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणाले की, त्यांना मारहाण करण्यात आली हे खरे आहे की आणखी काही कारण आहे, याचा शोध घेण्यास सांगितले आहे.
शिक्षकावर होऊ शकते ही कारवाई
प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, शिक्षकावर मुलांना दुखापत केल्याचा आरोप लागू शकतो. हा असा गुन्हा आहे ज्यासाठी त्याला आयपीसीच्या कलम 323, 325, 352 आणि 506 अंतर्गत शिक्षा होऊ शकते. तर, कलम 23JJ कायदा, 2000 नुसार, त्याला सहा महिन्यांपर्यंतची शिक्षा किंवा दंड किंवा दोन्हीही होऊ शकते. निसार दोषी आढळल्यास त्याच्यावर जुव्हेनाइल जस्टिस कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.