आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • JNU University Guidelines Update; Protests Fine And Violence | Protest Rules | Delhi News

JNU मध्ये हिंसाचार केल्यास अ‌ॅडमिशन होणार रद्द:नवीन नियमांत 17 गुन्ह्यांसाठी शिक्षा, आंदोलन केल्यास 20 हजारांचा दंड

नवी दिल्ली21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
हे नियम विद्यापीठातील सर्व विद्यार्थ्यांना लागू होतील. यामध्ये अर्धवेळ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.   - Divya Marathi
हे नियम विद्यापीठातील सर्व विद्यार्थ्यांना लागू होतील. यामध्ये अर्धवेळ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.  

आता नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना 20 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. कोणत्याही प्रकारच्या हिंसाचारासाठी 30 हजारापर्यंत दंड होऊ शकतो किंवा तुमचा विद्यापीठातील प्रवेश देखील रद्द होण्याची शक्यता आहे. आंदोलनांला रोखण्यासाठी विद्यापीठाने नवीन मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत.

रूल्स ऑफ डिसिप्लीन अ‌ॅंड प्रॉपर कंडक्ट ऑफ स्टूडंट्स या शिर्षकाखाली 10 पानी पुस्तकात निषेध, फसवणूक यांसारख्या कृतींसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा देण्यात आल्या आहेत. यासोबतच विद्यापीठात कोणत्याही प्रकारची चौकशी आणि निवेदन नोंदवण्याची प्रक्रियाही स्पष्ट करण्यात आली आहे.

महिन्याभरापूर्वीच नियम लागू झाले
कागदपत्रानुसार जर विचार केला तर 3 फेब्रुवारीपासूनच हे नियम लागू करण्यात आले आहे. हे नियमित आणि अर्धवेळ अशा दोन्ही विद्यार्थ्यांना लागू होईल. खरं तर, बीबीसीच्या वादग्रस्त माहितीपटाच्या स्क्रीनिंगवरून विद्यापीठात निदर्शनांची सीरीज सुरू झाली होती. त्यांना रोखण्यासाठी विद्यापीठाने हे ठोस पाऊल उचलले.

25 जानेवारी 2023 रोजी JNUमध्ये BBCच्या माहितीपटाच्या स्क्रीनिंगदरम्यान वाद झाला होता. त्यानंतर विद्यार्थ्यांनी निदर्शने केली होती.
25 जानेवारी 2023 रोजी JNUमध्ये BBCच्या माहितीपटाच्या स्क्रीनिंगदरम्यान वाद झाला होता. त्यानंतर विद्यार्थ्यांनी निदर्शने केली होती.

3 वर्षांपूर्वी JNUमध्ये प्रचंड गोंधळ, हिसंक आंदोलन
5 जानेवारी 2020 च्या रात्री, 50 हून अधिक मुखवटा घातलेल्या बदमाशांनी JNU मध्ये फी वाढीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर हल्ला केला. त्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना काठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. या हल्ल्यात विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा ऐशी घोष यांच्यासह 35 जण जखमी झाले आहेत. त्यांना दिल्ली एम्स आणि सफदरगंज रुग्णालयात दाखल करण्यात आले. वसतिगृहातही हल्लेखोरांनी तोडफोड केली. या घटनेत अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

जेएनयू विद्यापीठातील वादासंबंधी बातमी वाचा

बीबीसी डॉक्युमेंटरीवरून JNUमध्ये दगडफेक:NSUI म्हणाले- मोठ्या संस्थामध्ये दाखवणार, कॉंग्रेस नेते अ‌ॅंटनी म्हणाले- हे धोकादायक

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) मंगळवारी बंदी घालण्यात आलेल्या बीबीसी डॉक्युमेंटरीवरून गोंधळ झाला. रात्री उशीरापर्यंत क्यू आर कोडवरून डाऊनलोड करून डॉक्यूमेंट्री पाहणाऱ्या विद्यार्थ्यांवर दगडफेक करण्यात आली. दगडफेक कोणी केली हे समजू शकलेले नाही. अंधाराचा फायदा घेत हल्लेखोर पळून गेले. तत्पूर्वी येथील विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयाची वीज व इंटरनेट मंगळवारी रात्री बंद करण्यात आली होती. - येथे वाचा संपूर्ण बातमी

बातम्या आणखी आहेत...